
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड किकबॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप संत तुकाराम नगर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक आणि दीनानाथ जोशी, विभाग संघटक भोलाराम पाटील, उद्योजक सिन्हा साहेब, मुख्याध्यापक संतोष नेटके सर, पिंपरी चिंचवड असोसिएशनचे उपाध्यक्ष अभिषेक शो, जॉइंट सेक्रेटरी मंगेश येनपुरकर, विनोद जगदाळे सर आणि युवती अध्यक्ष निलम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेत पंच प्रमुख परवेज शेख यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रिन रॉड्रिग्ज, कार्तिक वाघ, जुई देशमुख, आदित्य शिरसाठ, आदित्य अडागळे, तरुण साने, सुनील यादव, युवराज शेतसंधी आणि ओम देशमुख यांनी पंच म्हणून काम पाहिले.
बक्षीस वितरण सोहळा उद्योजक प्रकाश रंधे बाळू निकम, महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष संतोष म्हात्रे आणि युवा सेनेचे गौतम लहाने यांच्या हस्ते पार पडला.

स्पर्धेतील विजेते:
सर्वसाधारण विजेतेपद: संत तुकाराम नगर येथील आर्यन्स मार्शल आर्ट्स
उपविजेतेपद: सांगवी येथील वारियर्स तायक्वांडो असोसिएशन
तृतीय क्रमांक: काळेवाडी येथील युनाइटेड शोतोकॉन असोसिएशन
स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या चॅम्पियनशिपमुळे खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली. आयोजकांच्या मेहनतीने ही स्पर्धा यशस्वी ठरली.
संतोष म्हात्रे
अध्यक्ष
महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशन