पिंपरी, दि. 16 (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शहरात ठिकठिकाणी कोपरा सभा घेण्यात आल्या. यावेळी उपस्थितांनी आमदार अण्णा बनसोडे यांच्या विजयाचा सुर आवळला.

दापोडी, देवीलिंक सोसायटी, रमाबाई नगर पिंपरी आणि भाजी मंडई येथे या कोपरा सभा झाल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभाग प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अनुसूचित जाती आयोग सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, शहराध्यक्ष संजय औसरमल, दिपक मेवानी, लीडकॉन माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, माई काटे, राजू बनसोडे, कार्याध्यक्ष मीरा कांबळे, यश बोथ, विनय शिंदे, उपाध्यक्ष कुमार कांबळे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष सागर कसबे, सुनीता अडसूळे, शोभा पगारे, शिवसेना नेते निलेश हाके, श्रीमती कुटे, आरपीआय नेते नवनाथ डांगे, सुरेश निकाळजे, भाऊसाहेब पठारे, जाकीर शेख, सतीश मटपरती, जगन्नाथ साबळे, गोपाळ खत्री, शंकर नाथानी, रमेश शिंदे, संतोष वडमारे, प्रवीण वडमारे, गौतम रोकडे, रविंद्र ओव्हाळ, ज्ञानेश्वर मोरे, अनिल औसरमल, लॉरेन्स साळवे, संजय बनसोडे, नितीन अडसूळ, प्रकाश दाभाडे, रोहित औसरमल, सुरज दाभाडे, विजू पोटे, स्मिता मसुरे आदी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे म्हणाले, महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वृद्धांसाठी वयोश्री योजना, विद्यार्थ्यांना स्टायपेंड, आरोग्यविषयक विविध योजना राबविल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचा सर्वाधिक लाभ पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महिलांनी घेतला आहे. यासाठी आमदार अण्णा बनसोडे यांनी चांगले प्रयत्न केले आहेत. तसेच अनेक नगरसेवकांच्या माध्यमातून त्यांनी शहरात कामे केली आहेत. शहराला झोपडपट्टी मुक्त बनविण्यासाठी एसआरए प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहेत. तसेच पुर बाधित क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी विविध कामांंबाबत आमदार अण्णा बनसोडे यांनी पाठपुरावा केला असल्याचे मगरे म्हणाले.

सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष संजय औसरमल म्हणाले, आमदार अण्णा बनसोडे कायम नागरिकांच्या संपर्कात राहतात. सार्वजनिक उत्सव, समारंभात ते सहभाग घेतात. नागरिकांच्या रुग्णालयाशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी आमदार अण्णा बनसोडे सतत मदतीचा हात देतात. पिंपरी भाजी मंडई येथे अण्णांनी 282 गाळे बांधून दिले. ते गाळे पुढील काळात पक्के करून दिले जाणार आहेत. त्याबाबतची प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे पक्के घर असेल अथवा भाजी विक्रेत्यांना पक्के गाळे असेल असा सर्व बाजूंनी लाभ देण्याचे काम आमदार अण्णा बनसोडे यांनी केले आहे.

गोरक्ष लोखंडे, ज्ञानेश्वर कांबळे यांनी देखील आमदार अण्णा बनसोडे यांनी केलेल्या कामांबाबत उपस्थितांना संबोधित केले. सुनील मगरे यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघात राहणाऱ्या मराठवाड्यातील नागरिकांच्या भेटी घेतल्या. मराठवाड्यातील नागरिक आमदार अण्णा बनसोडे यांच्या पाठीशी उभे असून तेच विजयी होतील अशी खात्री दिली.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »