पिंपरी, दि. 15 (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी शुक्रवारी (दि. 15) निगडी प्राधिकरण परिसरात प्रचार फेरी काढली. काही ठिकाणी पायी चालत तर काही ठिकाणी रथातून ही प्रचार फेरी निघाली. यावेळी प्राधिकरण परिसरातील भाजपसह महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
यावेळी आमदार अमित गोरखे, सदाशिव खाडे, आर एस कुमार, राजू मिसाळ, अनुप मोरे, सरिता साने, शैलाजा मोरे, शर्मिला बाबर, बाळासाहेब वाल्हेकर, समीर जावळकर, शैला पाचपुते, शैला निकम, रोहिणी नवले, सुवर्णा तडसे, कविता शिंदे, नंदिनी खरे, ऋषिकेश साने, विजय शिनकर, केदार चासकर, राजेश शिंदे, अरुण शिंदे, बाला शिंदे, समीर शिकलकर, राजेंद्र बाबर आदी उपस्थित होते.
प्रचार टिळक चौक येथून सुरू झाली. पुढे निळकंठेश्वर मंदिर, केदारेश्वर मंदिर, काचघर चौक, आशा भोसले घर, सोमेश्वर मंदीर, भेळ चौक, सावरकर मंडळ, सोमेश्वर चौक, गणेश तलाव, संत तुकाराम गार्डन, स्वामी विवेकानंद मंडळ, जय हिंद मित्र मंडळ, आंबा चौक, साई बाबा मंदिर या मार्गावरून काढण्यात आली.
महायुतीने केलेल्या कामांबाबत सर्व नागरिक आनंदी आहेत. पुढील काळात महायुती अधिक चांगल्या पद्धतीने कामे करणार असल्याचा विश्वास प्राधिकरणातील नागरिकांनी व्यक्त केला. त्यामुळे आम्ही सर्वजण महायुतीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहू असे आश्वासन प्राधिकरणातील नागरिकांनी दिले. आमदार अण्णा बनसोडे यांनी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले.