रूपाली चाकणकर यांचा ठाम विश्वास

पिंपरी, दि. 14 (प्रतिनिधी)
आमदार अण्णा बनसोडे यांनी जनतेची जी जी कामे प्राधान्याने करता येतील ती कामे केली आहेत. अजित पवार यांनी देखील पिंपरीसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. जनता अण्णांसोबत आहे. त्यामुळे येत्या 23 तारखेला अण्णांना गुलाल लागणारच, असा ठाम विश्वास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी गुरुवारी (दि. 14) संभाजीनगर, शाहूनगर, आंबेडकर नगर परिसरात पदयात्रा काढली. या पदयात्रेत रूपाली चाकणकर सहभागी झाल्या होत्या.

यावेळी आमदार अण्णा बनसोडे, अमित गोरखे, केशव घोळवे, मंगला कदम, राजू दुर्गे, नारायण बहिरवडे, कविता अल्हाट, बाळासाहेब वाल्हेकर, अनुराधा गोरखे, शीतल हगवणे, कविता खराडे, मनीषा गटकळ, आशा मराठे, मेघा पणशीकर, जया गवळी, अनिल राऊत, राजेंद्र घोडके, सपना कदम, सरिता साने, शैला निकम, जया गवळी, सुवर्णा तडसरे, रश्मी भल्ला, निखिल येवले, सय्यद पटेल, इरफान सय्यद, रोहिणी नवले, विश्वास शिंदे, राहुल गावडे आदी उपस्थित होते.

रूपाली चाकणकर म्हणाल्या, अजित पवार यांनी केलेल्या विकास कामांसोबत जनता येणार आहे. महायुती सरकारने राबविलेल्या लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी खूप टीका केली. आम्ही दीड हजार रुपये महिलांना देणार म्हटल्यावर विरोधक टाहो फोडत होते. आता त्यांनी जाहीर केलेल्या पंचसूत्री मध्ये पहिलेच आश्वासन असे आहे की, महिलांना दरमहा तीन हजार रुपये देऊ. आम्ही दीड हजार रुपये देणार म्हटल्यावर दीड हजार रुपयांमध्ये महिलांना विकत घेता का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. मात्र आता ते तीन हजार रुपये कोणत्या निकषावर देणार आहेत. तसेच ते आता तीन हजार रुपयांमध्ये महिलांना विकत घेणार का, असा सवाल देखील रूपाली चाकणकर यांनी उपस्थित केला.

लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील दोन कोटी 40 लाख महिलांनी घेतला आहे. महाविकास आघाडीने या दोन कोटी 40 लाख लाडक्या बहिणींच्या आत्मसन्मानाला ठेस पोहोचवली आहे. याबद्दल महाविकास आघाडीने राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची माफी मागितली पाहिजे, अशी भूमिका रूपाली चाकणकर यांनी मांडली.

अण्णा बनसोडे यांच्या पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद

आमदार अण्णा बनसोडे यांनी गुरुवारी काढलेल्या पदयात्रेला शाहूनगर, संभाजीनगर, आंबेडकर नगर मधील स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला. ही पदयात्रा तुळजाभवानी मंदिर येथून सुरू झाली. सुबोध विद्यालय, रसरंग स्वीट, अटल बिहारी वाजपेयी उद्यान, अष्टविनायक गणपती मंदिर, शाहू नगर, धम्मचक्र बुद्ध विहार, कमलनयन बजाज स्कूल, सोमेश्वर मंदिर, कस्तुरी मार्केट, अजंठा नगर, आंबेडकर कॉलनी या परिसरातून ही पदयात्रा काढण्यात आली. फुलांची उधळण करत आमदार बनसोडे यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.


                                                     
                     

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »