पिंपरी, दि. 13 (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी बुधवारी (दि. 13) पिंपरीगाव परिसरात प्रचार दौरा केला. पदयात्रेत महिलांनी मोठी हजेरी लावली. पिंपरी गावात महायुतीची ताकद मोठी असून आमदार अण्णा बनसोडे यांना पिंपरी गावातून चांगले मताधिक्य मिळणार असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी संदीप वाघेरे, सिद्धार्थ बनसोडे, संतोष कुदळे, प्रभाकर वाघेरे, प्रवीण शिंदे, सुहास कुदळे, दीपक मेवानी, हरेश चौधरी, गणेश वाळुंजकर, भाऊसाहेब वाघेरे, अमित कुदळे, कुणाल सातव, शहाजी अत्तार, सोनू कदम, निकिता कदम, मोनिका निकाळजे, सुवर्णा तडसरे, किशोर उदास, सुरेश लोंढे, कुणाल सातव, जयेश चौधरी, प्रसाद शिंदे आदी उपस्थित होते.
पिंपरी गावातील भैरवनाथ मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रेत हजारो महिलांनी सहभाग घेतला. पिंपरी गावातील विविध भागातून ही पदयात्रा निघाली. महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी भव्य पुष्पहार घालून आमदार अण्णा बनसोडे यांचे स्वागत केले. महिलांनी औक्षण करीत आमदार बनसोडे यांना विजयासाठी आशीर्वाद दिला.
लाडक्या बहिणींची विशेष उपस्थिती
पिंपरी गावातील पदयात्रेत हजारो लाडक्या बहिणींनी सहभाग घेतला. अण्णा बनसोडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, महायुतीचा विजय असो, अशा घोषणा देत महिलांनी साथ दिली. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महायुतीने मोठी कामे केली असल्याने महिलांची मोठी ताकद महायुतीच्या पाठीशी उभी असल्याचे महिलांनी सांगितले.