खराळवाडी, मोरवाडी मधील जनता म्हणते – अण्णाच पाहिजे पुन्हा आमदार

पिंपरी, दि. 11 (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी सोमवारी (दि. 11 ) गांधीनगर, खराळवाडी, कामगार नगर, आनंदनगर, मोरवाडी, लालटोपी नगर या परिसरात पदयात्रा काढत गाठीभेटी घेतल्या. या पदयात्रेला स्थानिक महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला. हजारोंच्या संख्येने महिला या पदयात्रेत सहभागी झाल्या.

खराळ आई मंदिर येथून पदयात्रेला सुरुवात झाली. परिसरातील गणपती मंदिर, भगवद्गीता मंदिर, मारुती मंदिर, नवयुग तरुण मंडळ, स्वामी समर्थ मंदिर, मैत्री बौद्ध विहार, दत्त मंदिर, अशा विविध मंदिरांना भेटी देत आमदार अण्णा बनसोडे यांनी काही घरांना भेटी दिल्या. महिलांनी त्यांचे औक्षण केले. तर तरुणांनी आमदार अण्णा बनसोडे यांचे फटाक्यांच्या जल्लोषात भले मोठे पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. पदयात्रेत लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

यावेळी राजेश पिल्ले, शैलेश मंगळवेढेकर, मंगल पानसरे, अमिता पानसरे, अजिज शेख, ॲड. दत्ता झुळूक, संजय मंगळवेढेकर, बाबा कांबळे, वामन गुंजाळ, दीपक भंडारी, नितुल पवार, संतोष दुबे, अमोल गुरखा, संजय गायकवाड, शुभम तांदळे, अजय धोत्रे, अजय शिंगाडे, अतुल धोत्रे, शेखर पाटील, उमेश शिंगाडे, युसुफ कुरेशी, मनोहर शिंगाडे, नारायण धोत्रे, जितेश मंजुळे, राहुल क्षीरसागर, आशा कांबळे, प्रकाश यशवंते, दिलीप साळवे, सूर्यकांत शिंगाडे, अनिल धोत्रे, निलेश बंदपट्टे, जितू अष्टेकर, तुषार ननवरे, रोहन भोसले, शंकर मुदगल, सचिन धोत्रे आदी उपस्थित होते.

अण्णा बनसोडे आम्हाला आमच्यातला माणूस वाटतात. कायम आस्थेने विचारपूस आणि वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने त्यांचे आमच्याकडे येणे जाणे असते. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा अण्णा बनसोडे हेच आमदार म्हणून हवे आहेत. आम्ही त्यांनाच मतदान करणार, असा संकल्प खराळवाडी, नेहरूनगर, गांधीनगर, आनंदनगर, मोरवाडी, लालटोपी नगर मधील नागरिकांनी केला.

महायुती मधील घटक पक्षातील सर्व सहकारी प्रचारात सक्रिय झाले आहेत. महायुतीने केलेल्या कामांवर नागरिक समाधानी आहेत. त्यामुळे पुन्हा महायुतीचे सरकार असावे अशी नागरिकांची इच्छा आहे. पिंपरी मध्ये नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मला महायुतीचा उमेदवार म्हणून विजयाची खात्री आहे.

आमदार अण्णा बनसोडे
महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार
Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »