आमदार अण्णा बनसोडे यांना तरुणाईचा वाढता पाठिंबा

पिंपरी, दि. 10 (प्रतिनिधी)
पिंपरी विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार अण्णा बनसोडे यांना तरुणाईचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. शेकडो तरुण दररोज आमदार बनसोडे यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी होत आहेत. तसेच अनेक तरुण कार्यकर्ते आपापल्या भागामध्ये अण्णांच्या विजयासाठी खडे ठाकले आहेत.

रविवारी (दि. 10) राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी आकुर्डी गाव, दत्तवाडी, गंगानगर, विठ्ठलवाडी या भागात प्रचार दौरा केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पालखी मार्गावरून आमदार बनसोडे यांच्या पदयात्रेला सुरुवात झाली.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, साई पूजा चौक, दत्तवाडी, विठ्ठल वाडी, विठठल मंदिर, श्री हनुमान मंदिर चौक, आकुर्डी मेन रोड, आकुर्डी गावठाण, क्रांतीनगर, श्रीकृष्ण नगर, सुदर्शन नगर, प्रभाग क्रमांक 15, पंचतारा नगर, पांढरकर वस्ती, गंगानगर, जिजा नगर, कै पांडुरंग बुवा काळभोर सभागृह या परिसरात रविवारी पदयात्रा काढण्यात आली.

भला मोठा पुष्पहार घालून आकुर्डी मध्ये आमदार अण्णा बनसोडे यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले. आकुर्डी ग्रामस्थांनी यापूर्वीचा आमदार बनसोडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आकुर्डी मध्ये आमदार बनसोडे यांच्या पदयात्रेला मोठी गर्दी पाहायला मिळाली.

वन साईड येणार सीट – आमदार अण्णा आकुर्डीकरांच्या मनात फिट, अण्णा बनसोडे येणार वन साईड, राष्ट्रवादी पुन्हा, घासून नाही तर ठासून येणार, अण्णा बनसोडे आगे बढो हम तुम्हारे साथ है, अण्णा बनसोडे यांचा विजय असो अशा घोषणा देत अण्णांची तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवड करण्याचा विश्वास आकुर्डीकरांनी व्यक्त केला.

यावेळी सदाशिव खाडे, राजू दुर्गे, प्रमोद कुटे, कैलास कुटे, कुणाल वाव्हळकर, तेजस्विनी दुर्गे, फारुख शेख, तुकाराम कुटे, नानासाहेब पिसाळ, अभिजीत पिसाळ, प्रसाद बनसोडे, शुभम वायकर, रोशन जगताप, बाळासाहेब भागवत, सुजित कांबळे, योगेश भोसले, बालाजी जाधव, दयानंद वाघमारे, संभाजी वाघमारे, दिनकर म्हस्के, भारत हुंडे, मोहन म्हस्के, बंडू वाघमारे, शिवाजी वाघमारे, नाना बनसोडे, राजेश बोबडे, दुर्गाप्पा देवकर, प्रशांत वाघमारे, सिद्धार्थ जोगदंड, मल्हारी लोंढे, प्रसाद बनसोडे, शुभम वायकर, कैलास कुटे, खेमराज काळे, चैतन्य देशपांडे, वरुण काळभोर, विनायक सुतार, विनायक आळवेकर, संभाजी काळभोर, पंढरीनाथ थरकुडे, संतोष तरटे, गणेश दातीर पाटील, श्रीकांत तडाखे, अक्षय गायकवाड, मुकेश गुरव, राहुल काळभोर, माऊली कुटे, ऋषिकेश काळे आदी उपस्थित होते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »