पिंपरीत महायुतीचा विजय निश्चित
आमदार अण्णा बनसोडे यांचा विश्वास
पिंपरी, दि. 11 (प्रतिनिधी)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी लाखोंची गर्दी होईल. पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार यावेळी लाखोंची जनता करेल, असा विश्वास पिंपरीचे महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला.
पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे येथे जाहीर सभा घेणार आहेत. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीची सत्ता आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच वरिष्ठ नेत्यांनी कंबर कसली आहे. त्यासाठी पुण्यातील टिळक रोडवर असलेल्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी (दि. 12) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.
महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला पिंपरी विधानसभा मतदारसंघातून मोठ्या संख्येने नागरिक जातील आणि महायुतीच्या विजयाचा निर्धार करतील. पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी लाखोंची गर्दी होईल. पिंपरी चिंचवड मधील तीनही जागा महायुती जिंकेल, असा विश्वास देखील बनसोडे यांनी व्यक्त केला.