केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून सभास्थळ पाहणी

पुणे, प्रतिनिधी –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी 12 नोव्हेंबर रोजी पुण्यातील टिळक रस्त्यावरील सभा महाविद्यालय या ठिकाणी महायुतीची जाहीर प्रचार सभा संपन्न होणार आहे. या सभेकरीता एक लाख लोक उपस्थित राहतील यादृष्टीने महायुती प्रयत्नशील असून सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीचे नेते या सभेस उपस्थित राहणार आहे. सोमवारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ ,मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रवक्ते संदीप खर्डेकर, श्रीनाथ भिमाले, अजय खेडकर, शिवसेना नेते किरण साळी यांनी सभा स्थळी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला आणि आवश्यक त्या सूचना केल्या.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम महाराष्ट्रात मंगळवारी दोन सभा सोलापूर आणि पुणे या ठिकाणी होत आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 58 विधानसभा मतदारसंघ असून त्यामध्ये मोदींच्या सभेमुळे सकारात्मक परिणाम निवडणुकीत दिसून येईल. पंतप्रधान मोदी यांची सभा ही पुणेकरांसाठी पर्वणी ठरेल .पुणेकर नेहमी पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतास उत्सुक असतात ,त्यांच्या सभेला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. भविष्यातील देशाची जडणघडण आणि महाराष्ट्रचे विकासा मधील योगदान याबाबत ते भाष्य करतील. पोलिसांनी देखील चांगल्या प्रकारे वाहतूक आणि गर्दी नियोजन व्यवस्था शहरात ठिकठिकाणी केलेली आहे. पुणे जिल्ह्यात 21 मतदारसंघ असून यापैकी 18 मतदारसंघ सध्या महायुती सोबत असून यंदाच्या निवडणुकीत 21 पैकी 21 मतदार संघ महायुतीकडे येतील असा आम्हाला दृढ विश्वास आहे .
भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे म्हणाले, सभा स्थळी 71 हजार खुर्चीची व्यवस्था करण्यात आलेली असून मैदानाच्या परिसरात आणि बाहेर देखील स्क्रीन व्यवस्था करण्यात आलेली आहे. तब्बल एक लाख लोक सभेसाठी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. तीन ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे.महायुतीचे सातारा आणि पुणे जिल्ह्यातील सर्व महायुती उमेदवार सभेस उपस्थित राहतील.
[6:55 pm, 11/11/2024] Sanjaye Mayekar Pro: हरियाणा प्रमाणे महाराष्ट्र मध्ये बहुमताने आमचे सरकार सत्तेत येईल – हरियाणा मुख्यमंत्री नायब सिंग सैनी
पुणे, प्रतिनिधी –
हरियाणा मध्ये नागरिकांनी तिसऱ्यांदा भाजप सरकारला बहुमत दिले यात गरिबांचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्र मधील लोकांना माझे आव्हान आहे की, काँग्रेस खोटी आश्वासने देऊन मते विभागणी करते आणि नंतर गरिबांचे शोषण करते हा त्यांचा पूर्वइतिहास आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिमाचल प्रदेश, कर्नाटक ,तेलंगणा , हरियाणा निवडणूक मध्ये महिलांना आणि तरुणांना आश्वासने दिली पण त्याची पूर्तता अद्याप करण्यात आली नाही. लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेसने संविधान बाबत खोटा प्रचार करून ,व्होट बँक राजकारण करत नागरिकांची दिशाभुल केली. त्यामुळे महाराष्ट्र मधील नागरिकांनी आता सतर्क राहून महायुतीला साथ द्यावी. हरियाणा प्रमाणे महाराष्ट्र मध्ये बहुमताने आमचे सरकार सत्तेत ये…
[7:01 pm, 11/11/2024] Sanjaye Mayekar Pro: बिबवेवाडी, मार्केट यार्ड परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी गंगाधाम चौकात वाहतुक प्रकल्पाला मंजुरी दिली असल्याची माहिती भाजप महायुतीच्या पर्वती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार माधुरी मिसाळ यांनी दिली.

मिसाळ यांच्या प्रचारार्थ आज प्रेमनगर, आंबेडकर नगर परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेविका मानसी देशपांडे, अनुसया चव्हाण, मनोज देशपांडे, प्रीतम नागपुरे, आशा बिबवे, विजय आल्हाट, बसू गायकवाड, सुनीता मोरे, संजय गावडे, शिवम देशपांडे, ज्ञानेश्वर मानकर, शकील शेख, प्रसाद देशपांडे, उषा साळवे, तुकाराम खंडागळे, ब्रम्हा मिसाळ, चेतन क्षीरसागर, आप्पा गाढवे, नवनाथ वांजळे, गायत्री कांबळे यांचा प्रमुख सहभाग होता.

मिसाळ म्हणाल्या, मार्केट यार्डमध्ये येणाऱ्या अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोफ्लडी होते. ही कोफ्लडी सोडविण्यासाठी गंगाधाम चौकात उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि कात्रजहून बिबवेवाडीकडे जाण्यासाठी स्वतंत्र 24 मीटर रस्त्याचे नियोजन करण्यात आले आहे. बिबवेवाडी ते कोफ्लढवा रस्त्यावर 520 मीटर लांबीचा आणि 16 मीटर रुंदीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. आई माता मंदिर ते मार्केट यार्ड या दरम्यान 460 मीटर लांबीचा आणि साडेतेरा मीटर रुंदीचा ग्रेड सेपरेटर आणि आई माता मंदिर ते झाला कॉम्प्लेक्स दरम्यान 24 मीटरचा स्वतंत्र रस्ता होणार आहे. या प्रकल्पाला 93 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे.

मिसाळ पुढे म्हणाल्या, अडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम एटीएमस ही अत्याधुनिक, स्वयंचलित वाहतूक सिग्नल प्रणाली पर्वती मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांवर कार्यान्वित करण्यात आली आहे. वाहतुकीची गती वाढवून नागरिकांचा वेळ वाचवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. चौकातील वाहनांची संख्या आणि वर्दळीनुसार सिग्नलचे व्यवस्थापन, प्रभावी वापरामुळे श्रम, वेळ, इंधनाची बचत होऊन प्रदूषणात घट होणार आहे. या माहितीचे संगणकीय यंत्रणेद्वारे संकलन, देवाण-घेवाण होऊन पुढील सिग्नल सिंक्रोनाइज होणार आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी वाहतूक गतीने पुढे जाण्यास मदत होणार आहे.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »