‘आपले अण्णा पिंपरीत पुन्हा’ घोषणेच्या गजरात कासारवाडी मध्ये आमदार अण्णा बनसोडे यांची पदयात्रा

पिंपरी, दि. 8 (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी शुक्रवारी (दि. 8) कासारवाडी परिसरात पदयात्रा काढून नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. या पदयात्रेला कासारवाडीतील महिलांनी आणि युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी आमदार बनसोडे यांचे औक्षण आणि फटाक्यांनी स्वागत करण्यात आले
.

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, सतीश लांडगे, बाळासाहेब भागवत, ॲड. अतिश लांडगे, बाबा कांबळे, सुप्रिया काटे, तात्यासाहेब जवळकर, नाना डवरी, आप्पा धावडे, बाळासाहेब जवळकर, देवदत्त लांडे, अमोल मोटे, औदुंबर कळसाईत, गजानन मोरे, प्रशांत चव्हाण, विकास आबा लांडे, रघुनाथ बाली जवळकर, मयूर रानवडे, भोला जाधव, रमेश लांडगे, किरण मोटे, शंकर बाबा दळवी, असिफ शेख, प्रतिभा जवळकर, रुपाली लांडे, सीमा बोरसे, दिपाली लांडे, पल्लवी सावंत, उषा पवार, संतोष सर्जने, अफसाना शेख, चांदभाई शेख, कमरुद्दिन तांबोळी, लतिफ सय्यद, सोहेल लांडगे, शिंदे मामा, शिवनाथ, विश्वनाथ वाखारी, एकनाथ मोटे, संजय शेंडगे, शशिकांत जवळकर, संजय लांडे, शाम लांडे, राजेंद्र शेळके, कविता पाटील, सोनाली सायकर, प्रदीप जाधव, वृषाली जगताप, बाळासाहेब लांडे, संतोष टोणगे, कविता पाटील, पल्लवी सावंत, पंकज रानवडे आदी उपस्थित होते.

कासारवाडी मधील गावठाण, केशवनगर, शास्त्री नगर, जवळकर कॉलनी, गुलिस्तान नगर, विकास नगर, शास्त्री चौक परिसरातून पदयात्रा काढण्यात आली. सूर्यमुखी महादेव मंदीर येथून पदयात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर हनुमान मंदिर, भैरवनाथ मंदिर, सिद्धिविनायक गणेश मंदिर, यासह विकासशील सोसायटी, सरिता कुंज सोसायटी, सरिता संगम सोसायटी या मोठ्या सोसायट्यांना भेटी दिल्या. सरिता संगम सोसायटी मधील ज्येष्ठ नागरिकांनी आमदार अण्णा बनसोडे यांचा सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच आम्ही सर्व तुमच्या पाठीशी असल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.

नाना डवरी, प्रकाश जवळकर, किरण मोटे, रघुनाथ जवळकर, विश्वनाथ वाखारी, रुपाली लांडे, संजय शेंडगे, आप्पा धावडे, बाळासाहेब जवळकर, उषा पवार, औदुंबर कळसाईत, संभाजी भोवले, विजय भोसले, अशोक लांडगे, बाळू पवार, कविता पाटील, अतुल भोसले यांच्या घरी आमदार अण्णा बनसोडे यांनी भेट दिली.

महिला आणि युवकांची लक्षणीय उपस्थिती

आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचार रॅली मध्ये कासारवाडी येथील शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तरुणींपासून वृद्ध महिलांनी तसेच युवकांनी पदयात्रेत सहभाग घेतला. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘आपले अण्णा पिंपरीत पुन्हा’ या घोषणेने कासारवाडीत पदयात्रा पार पडली.

फटाक्यांची आतषबाजी

कासारवाडी गावठाण आणि परिसरात आमदार अण्णा बनसोडे यांचे ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीने जंगी स्वागत करण्यात आले. चौकाचौकात शाल, श्रीफळ देऊन नागरिकांनी अण्णांचा सत्कार केला. सर्वांच्या सत्काराचा स्वीकार करत आमदार अण्णा बनसोडे यांनी कासारवाडी ग्रामस्थांचे आशीर्वाद घेतले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »