लोकशाहीमध्ये मतदाराचे मोठे स्थान व योगदान आहे. पुणे शहरातील मतदारांचा मतदानामध्ये टक्का वाढावा यासाठी २०९ शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ, स्वीप व्यवस्थापन समितीमार्फत मतदार संघात जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी झाली नसेल तर नोंदणी करणेबाबत व मतदारांना १००% मतदान करण्याचे आवाहन करण्यात येते.
त्यानुषंगाने २०९ शिवाजीनगर विधानसभा मतदार संघामध्ये मतदार जनजागृती करणेकरिता स्वीप व्यवस्थापन कक्षामार्फत व समाज विकास विभागामार्फत दि.०६/११/२०२४ रोजी वडारवाडी – पांडवनगर – गुंजाळवाडी – ३३६ वडारवाडी – नरेगल मठ – मंजाळकर चौक – गोलंदाज चौक – मारुती मंदिर – संत रामदास स्वामी प्राथमिक विद्यालय – पांडवनगर पोलीस चौकी या मार्गावर मतदान जनजागृती करण्यासाठी रँलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री.दादासाहेब गिते (मा.निवडणूक निर्णय अधिकारी),श्री. नितीन उदास (उप आयुक्त समाज विकास विभाग), श्री. अविनाश सपकाळ (उप आयुक्त परिमंडळ क्र.२), श्री.बाळासाहेब ढवळे पाटील (मा.सहा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा मा.महापालिका सहाय्यक आयुक्त, शिवाजीनगर घोलेरोड क्षे.का.), श्रीमती शिल्पकला रंधवे (मा.सहा.निवडणूक निर्णय अधिकारी), श्रीमती प्राजक्ता घोरपडे (मा.सहा.निवडणूक निर्णय अधिकारी), श्रीमती सायली धस (मा.अति.सहा.निवडणूक निर्णय अधिकारी) यांचे मार्गदर्शनाखाली व श्री. रामदास चव्हाण (मुख्य समाज विकास अधिकारी), श्री पांडुरंग महाडिक (समाजसेवक), स्वीप समन्वयक श्री.दिपक कदम, श्री. दिपक वाघमारे, श्री. सागर काशिद व श्री. सागर शिनगारे, मिडिया सेलचे नोडल ऑफिसर विशाल मेहेत्रे, समूह संघटिका श्रीमती लीना सोनोरीकर, श्रीमती उज्वला पानसरे, श्रीमती स्वाती जाधव उपस्थितीत होते. सदर उपक्रमास शेकडो महिलांनी उपस्थिती दर्शविली असून सहा.पोलीस निरीक्षक श्री. दादाराजे पवार यांनी रँलीस संबोधून त्यांचे उपस्थितीत नागरिकांना मतदान करणेबाबतची शपथ देण्यात आली व रँलीचा समारोप करण्यात आला.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »