पुणे: भारतीय निवडणूक आयोगाकडून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक पदी श्रीमती के हेमावती व निवडणूक खर्च निरीक्षक पदी श्री अमित कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री दादासाहेब गीते यांनी दिली आहे.
श्री अमित कुमार यांचा निवासाचा पत्ता व्ही व्ही आय पी विश्रामगृह ग्रीन बिल्डिंग, कीन्स गार्डन, पुणे येथील कक्ष क्रमांक ए.१०४ असं असून यांचे संपर्क अधिकारी श्री मनिष जाधव हे असून त्यांचा संपर्क क्र. ९३०७८०८४८९ असा आहे.
श्रीमती के हेमावती यांचा निवासाचा पत्ता व्ही व्ही आय पी विश्रामगृह ग्रीन बिल्डिंग, कीन्स गार्डन, पुणे येथील कक्ष क्रमांक ए.205 असं असून त्यांचा ई मेल आयडी genobsershivajinagar.kothrud@gmail.com आहे. यांचे संपर्क अधिकारी श्री दिगंबर हौसारे हे असून त्यांचा संपर्क क ९४०५३०६९९९ असा आहे.
श्रीमती के. हेमावती यांना भेटण्याची वेळ दुपारी 3 ते 5 व श्री अमित कुमार हे सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत व्ही व्ही आय पी विश्रामगृह, ग्रीन बिल्डिंग, क्वीन्स गार्डन, पुणे या ठिकाणी भेटतील अशी माहिती शिवाजीनगर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून दिली आहे.