समाजाभिमुख सुशिक्षित नेतृत्व हवे आहे
पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहरातील बौद्ध, मागास दुर्बल घटकाला समाजाभिमुख सुशिक्षित तसेच दृष्टे नेतृत्व हवे आहे असे मत बौद्ध समाज विकास महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब डोळस यांनी व्यक्त केले.बौद्ध समाज विकास महासंघाच्या वतीने आज पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार डॉ सुलक्षणा शिलवंत यांना पाठिंबा व्यक्त करण्यात आला. यावेळी भाऊसाहेब डोळस म्हणाले की, बौद्ध दलित व मागासवर्गीय समाजाला अपेक्षित असलेले सहकार्य व विकास आजतागायत होऊ शकला नाही यासाठी या समाजाच्या प्रश्नांची जाण असलेल्या सुशिक्षित व दृष्टे नेतृत्वाची गरज आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समाज विकास विभागाच्या मार्फत मागासवर्गीय समाजासाठी ठेवण्यात आलेला निधी हा या समाजाच्या विकासासाठी योग्य अर्थाने खर्च होत नाही अनेक वेळा खर्च न झालेला निधी राजकीय दबावापोटी इतर प्रकल्पांवरती वळवला जातो व त्यामुळे मागासवर्गीय समाजावर अन्याय होत आहे हा अन्याय दूर करण्यासाठी तसेच समाजाच्या विकासासाठी व उन्नतीसाठी डॉ.सुलक्षणा शिलवंत यांच्यासारख्या सुशिक्षित अभ्यासू व समाजाच्या प्रश्नांची जाण असलेल्या नेतृत्वाला निवडून देण्याची आवश्यकता आहे.यावेळी बोलताना महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत म्हणाल्या की आपण आजवर समाजातील तळागाळातील घटकाला मदत करण्यासाठी व त्यांचे आर्थिक सामाजिक शोषण थांबविण्यासाठी लढा देत आलेलो आहोत. माझे वडील बुद्धवासी अशोक शिलवंत यांनी घालून दिलेली शिकवण खऱ्या अर्थाने पार पाडण्याचा आपला प्रयत्न राहील व समाजासाठी सातत्याने आपण योगदान देत राहू.यावेळी बौद्ध समाज विकास महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब डोळस, उपाध्यक्ष रवींद्र दुधेकर, सचिव विजय गायकवाड, कार्याध्यक्ष अनिल सूर्यवंशी, सल्लागार शरद जाधव, एस. एल. वानखेडे, नामदेव वाळके, आर. जी. गायकवाड आदी प्रमुख उपस्थित होते.