राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बंडखोर उमेदवार दीपक सौदागर रोकडे यांची पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांच्या आशीर्वादाने पिंपरी विधानसभेतून माघार व सुलक्षणा शीलवंत यांना पाठिंबा…

पिंपरी :- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 याचे पडघम वाजले असून आज ४ नोव्हेंबर 2024 रोजी उमेदवारी माघार घेण्याचा दिवस असल्याकारणाने काल संध्याकाळी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी भेटीचा वेळ निश्चित केल्यामुळे आज सकाळी पैलवान दीपक रोकडे यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची भेट घेतली व पिंपरी विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण माहिती देऊन सुलक्षणा शीलवंत यांना पाठिंबा जाहीर केला व उमेदवारी अर्ज माघारी घेतला. दीपक रोकडे यांची ताकद आता सुलक्षणा शीलवंत यांना मिळणार असून महाविकास आघाडीची ताकद डबल झाली आहे याचा धसका महायुतीच्या उमेदवाराला नक्कीच घ्यावा लागणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही.पैलवान दीपक रोकडे यांनी प्रथम ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेब यांची भेट घडून आणण्याचे काम यांनी केल्यामुळे त्यांचे आभार व्यक्त केले.

आपली राजकीय ताकद पिंपरी विधानसभेमध्ये असल्याकारणाने त्यांनी पक्षाला उमेदवारी मागितली होती परंतु काही कारणास्तव त्यांना उमेदवारी डावलण्यात आली परंतु पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून साहेबांची भेट घेऊन आज उमेदवारी अर्ज माघार घेतला येत्या काळामध्ये महाविकास आघाडीला भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन दीपक रोकडे यांनी केले.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »