पिंपरी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) बंडखोर उमेदवार म्हणून पैलवान दीपक रोकडे यांचा पिंपरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल.

पैलवान दीपक सौदागर रोकडे हे बूस्ट एज्युकेशन सोसायटीचे संचालक तसेच निसर्गधरा पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष आहेत. दीपक रोकडे यांची जन्मभूमी मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर असून कर्मभूमी पिंपरी चिंचवड आहे. स्वच्छ चारित्र्य आणि आश्वासक नेतृत्व म्हणून उच्चशिक्षित दीपक रोकडे यांना महाविकास आघाडीने पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी असे आवाहन खासदार शरदचंद्र पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आले होते परंतु काही कारणास्तव त्यांना उमेदवारी मिळाली नाही.

दीपक रोकडे यांचा पिंपरी मतदार संघात दांडगा संपर्क असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) बंडखोर उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत प्रदीप सातरस, सदानंद चव्हाण, सागर रोकडे, विजय देवकर आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »