अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी आज दि २९/१०/२०२४ रोजी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला . लोकसभेत महाविकास आघाडी ला विजयी करण्यासाठी राज्यभर सत्ताधारी पक्षांच्या चुकीच्या धोरणाविरोधात रस्त्यावरची लढाई सर्व पुरोगामी संघटनांनी लढली. परंतु प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेत शहरातील चळवळीतील कार्यकर्त्याना वेळोवेळी डावलले जात असल्याने व शहरातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी चिचंवड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत असल्याचे सिद्दीकभाई शेख यांनी सांगितले.

यावेळी अपना वतन संघटनेचे कार्याध्यक्ष राजू शेरे , महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर , संघटक तौफिक पठाण , वसीम पठाण , अब्दुलअजीज शेख , मौलाना निजामुद्दीन , सलीम शेख , जितेंद्र जुनेजा यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .