पिंपरी २८ ऑक्टोबर २०२४ : आदित्य बिरला समुहाच्या इंद्रिया या ज्वेलरी ब्रँडचे दुसरे दालन सिटी वन मॉल, पिंपरी येथे सुरू करण्यात आले. या नवीन दालनाच्या निमित्ताने या समुहाने भक्कम ब्रँड इक्विटी व बाजारपेठेच्या सखोल अभ्यासासह आपला कन्झ्युमर पोर्टफोलिओ अधिक बळकट केला आहे.प्रेमाने घडविलेल्या प्रत्येक दागिन्यातून भारतीय कारागिरीची उत्कृष्टता दिसून येते आणि सोने, पोलकी व हिऱ्याच्या दागिन्यांची तब्बल १६,००० हून अधिक डिझाइन्स या ठिकाणी आढळतात.

पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून येथे आर्थिक प्रगती वेगाने होत आहे आणि येथील दागिन्यांच्या बाजारपेठाही समृद्ध आहेत. इंद्रियासाठी या शहराच्या निमित्ताने देशातील एक अत्यंत आश्वासक भागातील चौखंदळ व वैविध्यपूर्ण ग्राहकवर्गाशी जोडण्याची असामान्य संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्राची परंपरा व आधुनिकता यांचा मिलाफ पुण्यात आढळतो. त्यामुळे उत्तम कारागिरी दार्शिवण्यासाठी हे एक आदर्श वातावरण आहे. पुण्याचा समृद्ध वारसा आणि तरुण व डायनामिक लोकसंख्येमुळे पुणे ही डिझाइन व इनोव्हेशनची मागणी असलेल्या ग्राहकांशी जोडण्यासाठी इंद्रियाचा विस्तार करण्यासाठी एक रोमांचक जागा आहे.

पुढील पाच वर्षांत भारतातील आघाडीच्या तीन ज्वेलरी रिटेलर्समध्ये स्थान प्राप्त करण्याच्या उद्दिष्टाने आदित्य बिरला समुहाचे अध्यक्ष श्री. कुमार मंगलम बिरला यांनी जुलै महिन्यात इंद्रिया लाँच केले. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला तब्बल रु.५,००० कोटींच्या अभूतपूर्व गुंतवणुकीचे पाठबळ लाभले आहे. यातून भारतातील ज्वेलरी रिटेल क्षेत्रात क्रांती घडविण्याचा आदित्य बिरला समुहाचा निर्धार स्पष्ट होतो.

या लाँचवर प्रतिक्रिया देताना इंद्रियाचे संचालक दिलीप गौर म्हणाले, “इंद्रियाच्या माध्यमातून ज्वेलरी क्षेत्रातील कल्पकता, व्याप्ती, तंत्रज्ञान आणि ग्राहक अनुभवातील मापदंडांची पुनर्व्याख्या करण्याचा आमचा निर्धार आहे. प्रत्येक दागिन्यामागे कारागिरीची एक वैशिष्ट्यपूर्ण कथा असते, या समजूतीवर हा ब्रँड आधारलेला आहे. एकमेवाद्वितीय उत्पादन, असामान्य ग्राहक अनुभव आणि परस्परसंवादी खरेदीचा प्रवास यामुळे ज्वेलरीच्या माध्यमातून स्वतःला अभिव्यक्त होण्याचे साधन उपलब्ध होते. आमच्या उत्पादनात चिरंतन कारागिरीची सांगड घालण्यात आली आहे आणि त्याच वेळी समकालीन डिझाइनचा नव्याने विचार करण्यात आला आहे. आमची प्रादेशिक निवड वेगवेगळ्या परंपरांचा आदर करते आणि इतर संस्कृतींनाही त्यांचा आनंद घेण्याची संधी देते.”

इंद्रियाचे सीईओ संदीप कोहली म्हणाले, ” आमचे मूल्य वेगळेपण, खास डिझाइन्स, वैयक्तिक सेवा आणि प्रादेशिक वैशिष्ट्यांवर आधारित आहे. नावीन्यपूर्ण खास अनुभव व एक्सक्लुझिव्ह लाउंज हे इंद्रियाचे वैशिष्ट्य आहे. इन-स्टोअर स्टायलिस्ट व एक्स्पर्ट ज्वेलरी कन्सल्टंट्सशी चर्चा करून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या कस्टमायझेशन सेवा यामुळे पचेंद्रियांना सुखद अनुभव देण्याचे वचन मिळते आणि अतुलनीय खरेदी प्रवास अनुभवता येतो. आमच्या बेस्ट-इन-क्लास डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे डिजिटल व प्रत्यक्ष टचपॉइंट्समुळे ग्राहकांना अखंड अनुभव प्राप्त होईल आणि दागिन्यांच्या जगात एक नवे युग अवतरेल.”

इंद्रिया दालन हेसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. हा एक स्टुडिओ असू शकतो, जिथे पर्सनल स्टायलिस्ट खास तुमच्यासाठी दागिने निवडतो, हा भारतीय कारागिरीचा सोहळा असू शकतो, एखाद्या भावी वधुसाठी स्टुडिओ असू शकतो, जिथे ती विविध उत्तम डिझाइन्समधून आपली निवड करू शकते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »