पुण्यातील श्री गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे शिवाजीनगर कोर्ट ते स्वारगेट मेट्रो मार्गिकेचे लोकार्पण व स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो मार्गिकेचा भूमिपूजन सोहळा देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते विडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडला. यावेळी ऐतिहासिक भिडे वाड्याच्या शाळेचे भूमिपूजनही करण्यात आलं.
या महत्वपूर्ण मेट्रो प्रकल्पामुळे पुण्याच्या विकासाला अधिक चालना मिळणार असून हे मेट्रो प्रकल्प पुण्यासारख्या शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यात नक्कीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार, मा. छगन भुजबळ, मा. उदय सामंत यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.