माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

पिंपरी चिंचवड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप आणि चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी जगताप यांच्यासंदर्भात जाणीवपूर्वक अफवा आणि खोटे वृत्त पसरविण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामाध्यमातून भारतीय जनता पक्षालाही नाहक बदनाम करण्याचे षडयंत्र दिसून येत आहे. त्यामुळे अशाप्रकारे खोटे वृत्त पसरविणाऱ्यांची  सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी, भारतीय जनता पक्षाचे माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली आहे.  यासंदर्भात नामदेव ढाके यांनी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि निवेदन दिले आहे.


 सदर निवेदनात ढाके यांनी म्हंटले आहे की, दोन दिवसांपूर्वी बुधवारी ( दि. १८ सप्टेंबर) व्हाट्सअप या समाजमाध्यमावर ९३७३९४१३८१ या मोबाईल क्रमांकावरून भारतीय जनता पक्षाच्या आमदार अश्विनी जगताप आणि त्यांच्यासमवेत पक्षाचे २० नगरसेवक पक्ष सोडणार असल्याचे खोटे वृत्त पसरविण्यात आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला बदनाम करण्यासाठीचा हा खोडसाळपणा सदर मोबाईलधारकाने जाणीवपूर्वक केला.

भाजप शहराध्यक्ष, आमदार, २० नगरसेवक यांचे कोणतेही पत्र अथवा संमती नसताना देखील अशाप्रकारचे खोटे वृत्त समाजमाध्यमांद्वारे पसरवून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणे व पक्षाची आणि शहराध्यक्ष तथा आमदार यांची प्रतिमा मलिन हा चुकीचा हेतू सदर मोबाईलधारकाचा दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित मोबाईलक्रमांक धारकाची सखोल चौकशी करून त्याच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नामदेव ढाके यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
सदर निवेदनावर माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, संतोष कांबळे, हर्षल ढोरे, शारदा सोनवणे, माधवी राजापुरे, अंबरनाथ कांबळे, महेश जगताप, उषा मुंढे, शशिकांत कदम, सागर आंघोळकर, निर्मला कुटे, शत्रुघ्न उर्फ बापू काटे, आरती चोंधे, ममता गायकवाड, कांतीलाल भूमकर, झामाताई बारणे, अभिषेक बारणे, मनीषा पवार, तानाजी बारणे, संदीप गाडे, नीता पाडाळे, विनोद तापकीर, देविदास पाटील, सविता खुळे, बाबासाहेब त्रिभुवन, संदीप नखाते, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे, विठ्ठल भोईर, अश्विनी चिंचवडे, सचिन चिंचवडे, करुणा चिंचवडे, मोनाताई कुलकर्णी, बिभीषण चौधरी, संगीता भोंडवे, बाळासाहेब ओव्हाळ आदी माजी नगरसेवक, स्वीकृत सदस्य,   पदाधिकारी यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »