एमआयडीसी परिसरात राबविले भयमुक्त अभियान

भोसरी एमआयडीसीतील महिला कामगारांच्या सुरक्षेसाठी दुर्गा ब्रिगेड आक्रमक झाली आहे. दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे बुधवारी ( दि. 28) भोसरी एमआयडीसी E L ब्लॉक येथे भयमुक्त एमआयडीसी अभियान राबविण्यात आले.

यावेळी भोसरी एमआयडीसी स्पाईन रोड पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक नंदकुमार महाडिक साहेब उपस्थित होते यावेळी महिला कामगारांना कोणतीही समस्या निर्माण झाल्यास पोलिसांतर्फे पूर्ण सहकार्याची भूमिका आणि त्वरित आरोपींना कठोर शासन करण्यात येईल आणि पोलिसांतर्फे सहकार्याची भूमिका महिला भगिनींना कायम असेल असे सांगण्यात आले

भोसरी चिंचवड एमआयडीसी परिसरात हजारो महिला कामासाठी येतात. कामावर येताना आणि जाताना अनेक महिलांना छेडछाडीच्या प्रकाराला सामोरे जावे लागते. तसेच अनेक कॉन्ट्रॅक्टरतर्फे महिलांची पिळवणूक तसेच शारीरिक मानसिक अत्याचार केला जात असल्याचे दिसून येते. परंतु, गरीब महिला कामगार पोटाचा प्रश्न असल्यामुळे भीतीपोटी हे सर्व सहन करत असतात. याबाबत दुर्गा ब्रिगेड संघटनेकडे अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत. एमआयडीसी परिसरात अंतर्गत बस सेवा नसल्यामुळे महिलांना खूप अंतर चालत जावे लागते. तसेच रस्त्यालगत महिला स्वच्छतागृह नसल्याने महिलांची कुचबना होते. एमआयडीसी परिसरामध्ये प्रत्येक ब्लॉक मध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी छोटी पोलीस चौकी आणि पोलीस गस्त सकाळी ६ ते ९ व संध्याकाळी ५ ते ८ असणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी दुर्गा ब्रिगेड संघटनेने पुढाकार घेऊन भयमुक्त एमआयडीसी अभियान घेतले. या अभियानांतर्गत महिलांना सुरक्षा तसेच महिलांच्या मूलभूत समस्या याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून या समस्या त्वरित सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार संघटनेने केला आहे.

प्रतिक्रिया

एमआयडीसी परिसरामध्ये नोकरदार महिलांना सुद्धा स्वप्रशिक्षणार्थ प्रशिक्षण देण्यात येणार असून महिलांनी स्वतःच आता खंबीर होणे आवश्यक आहे.

  • दुर्गा भोर, संस्थापक अध्यक्ष : दुर्गा ब्रिगेड संघटना.

प्रतिक्रिया

पुढील काळामध्ये महिला कामगारांवर कोणीही अत्याचार केला तरी त्याला त्याच पद्धतीने जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. नराधमांना पोलिसांच्या ताब्यात देऊन त्वरित त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. एमआयडीसीतील सर्व कंपनी मालकांनी आपापल्या कंपन्यांमध्ये महिला तक्रार पेटी बसवून घ्यावी. जेणेकरून महिलांना आपल्या तक्रारी या तक्रार पेटीमध्ये टाकता येतील आणि त्वरित महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी मदत होईल.

  • अभय भोर, संस्थापक अध्यक्ष : स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन.
    __———————————–+

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »