- सोसायटीधारक नागरिकांना मोठा दिलासा
- भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार
पिंपरी : भोसरी विधानसभा मतदार संघातील चिखली येथे डिफेन्स कॉलनी परिसरातील पाणी समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे सोयटीधारक व स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
डिफेन्स कॉलनी येथील पाणी पुरवठा विस्कळीत आणि अपुरा होत आहे. अशा तक्रारी स्थानिक नागरिक व रहिवाशांनी यांनी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी महानगरपालिका क क्षेत्रीय कार्यालयाचे संबंधित अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. पाणी समस्या कायमस्वरुपी सोडवण्याकरिता उपाययोजना करण्याची सूचना केली होती.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते विनायक मोरे यांच्या उपस्थितीमध्ये महानगरपालिका अधिकारी व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीमध्ये नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. आगामी काळात या भागातील पाणीपुरवठा सक्षम होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
प्रतिक्रिया:
भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ट गावांमध्ये २० ते ३० वर्षांपूर्वीची जुनी पाणी पुरवठा यंत्रणा आहे. गेल्या १० ते १५ वर्षांमध्ये मोठ्याप्रमाणात नागरीकरण झाले असून, लोकसंख्याही प्रचंड वाढलेली आहे. सोसायटीधारक आणि नागरिकांच्या मागणीनुसार ज्या भागात अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होतो आहे. त्या ठिकाणी तात्काळ नवीन जलवाहिनीचे काम हाती घेण्यात येते. महानगरपालिका प्रशासन व आम्ही लोकप्रतिनिधी नागरिकांना पायाभूत सोयी-सुविधा सक्षमपणे देण्याबाबत कटिबद्ध आहोत.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.