
शहरातील मध्यवर्ती स्थान असलेले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक भीमसृष्टी पिंपरी त्या ठिकाणीभारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला . या प्रसंगी डिफेन्स फोर्स लीग संस्थेतर्फे पूर्व सैन्य अधिकार्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले, तसेच उपस्थितांनी अमर जवान स्मारकास पुष्पचक्र अर्पित करून शहीद जवानांना श्रद्धांजलि वाहिली.

पूर्व सुबेदार कृष्णा काटेकर यांनी ध्वजारोहण केले व डिफेन्स फोर्स लीग चे पैरा विंग अध्यक्ष कमांडो रघुनाथ सावंत यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केले . या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित अण्णासाहेब बोदडे उपायुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका. प्रफुल पौराणिक जनसंपर्क अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका. चंद्रकांत कुंभार कनिष्ठ अभियंता. धम्मराज साळवे रयत विद्यार्थी विचार मंच. गिरीश वाघमारे सामाजिक कार्यकर्ते. व डि आय एफ टी फाउंडेशन चे संस्थापक नरेश गोल्ला , डायरेक्टर सुनिल वडमारे, दृष्टी जैन, डि एफ एल चे डायरेक्टर राजेंद्र जाधव यांनी स्वागत केले . राजु भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. मनोज गजभार यांनी या कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन सांभाळले या

प्रसंगी पूर्व सेनानींचा हस्ते महापालिकेतील जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पौराणिक, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत कुंभार, उद्यान विभागातील राजेश वसावे,
माजी नगरसेवक मारुती भापकर, अधिकारी निलेश केदार, राजु भालेराव, एडवोकेट अशोक बडेकर, एडवोकेट उमेश गवळी, मारुती भापकर, स्वप्नील कांबळे, महायान मसुरे, रवी कांबळे, राजेंद्र उजनिवाल यांचा सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याचे आयोजन करण्यात



डि आय एफ टी फाउंडेशन, डिफेन्स फोर्स लीग, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्यागमुर्ती माता रमाई स्मारक समिती, बौद्ध समाज विकास महासंघ, रयत विद्यार्थी विचार मंच , बुद्ध लेण्या मुक्ति आंदोलन समिती, अशोका बहुद्देशीय संस्था, समता सैनिक दल यांचा सहभाग होता. महापालिकेतील अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचेही विशेष सहकार्य लाभले. व पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.