– मावळ लोकसभा मतदारसंघातून विजयी करण्याचे आवाहन

– ज्येष्ठ नागरिकांशी समस्यांवर मनमोकळेपणाने गप्पा

पिंपरी :- मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी आज, रविवारी सकाळी पिंपळे सौदागर लिनियर गार्डन येथे मॉर्निंग वॉक करत अभिनव पद्धतीने मतदारांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी मोकळेपणाने वाघेरे पाटील यांच्यासोबत अनेक समस्यांवर‌ देखील चर्चा केली.

संजोग वाघेरे पाटील यांनी रविवारी सकाळी लिनियर गार्डन येथे जॉगिंग पार्कला भेट दिली. यावेळी दररोज या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांसोबत संवाद साधला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, तसेच हास्य क्लब आणि योगा ग्रूपचे सदस्य आवर्जून उपस्थित होते. वाघेरे पाटलांनी यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पिंपरी चिंचवड शहरातील लोकांच्या समस्यांवरही चर्चा केली.

मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मशाल चिन्ह लक्षात ठेवा. आपल्या समस्या सोडविण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत तुमचा आशीर्वाद द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित सर्वांना केले. खासदार म्हणून देखील आपल्यासोबत वेळोवेळी संवाद साधण्यासाठी मी उपलब्ध असेल, असा विश्वास देखील वाघेरे पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांना दिला.

प्रतिक्रिया……….

शहरात अनेक उद्यानांमध्ये नागरिक सकाळी, तसेच संध्याकाळी व्यायामासाठी येतात. त्यांच्यासाठी ओपन जीमचे साहित्य महापालिकेच्या माध्यमातून बसविण्यात येते. परंतु, जीमच्या साहित्याची संख्या कमी असल्यामुळे व साहित्याची दुरावस्था होते. ज्येष्ठ नागरिकांना त्याचा वापर करता येत नाही. यासह वाढणारी वाहतूक कोंडी, पादचारी मार्गाची गरज अशा अनेक बाबी उपस्थित नागरिकांनी माझ्यासमोर मांडल्या. देशातील स्थिती आणि राजकारणावर आपली मते व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे महत्त्वाचे घटक आहेत. त्यांची काळजी किंवा त्यांना मिळणार्‍या सुविधा याकडे देखील आपण लक्ष देवू, याबाबत त्यांना आश्वस्त केले. तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक सर्वांनीच बदल घडविण्याचा निश्चय केला आहे. हे त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर दिसत असून येत्या ४ जून रोजी हेच आपल्याला पाहायला मिळेल.
– संजोग वाघेरे पाटील, उमेदवार, मावळ लोकसभा मतदारसंघ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »