पुणे : कॅनडातील टोरंटो येथील मराठी भाषिक मंडळ या सेवाभावी संस्थेतर्फे २१ एप्रिल रोजी २०२४ रोजी ३६ व्या मराठी साहित्य सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या मानद अध्यक्ष (बाह्य) पदासाठी प्रसिद्ध गप्पाष्टककार व मन करारे प्रसन्नचे सादरकर्ते डॉ. संजय उपाध्ये यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अशी माहिती कॅनडा निवासी आणि सध्या पुणे दौर्‍यावर असलेले मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री.चंद्रशेखर मराठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


मराठी भाषिक मंडळाचे अध्यक्ष श्री. ऋषिकेश रानडे, कार्यवाहक श्री. संग्रम पाटील आणि कोषाध्यक्ष श्री. नंदन जोशी यांनी मंडळाच्या वतीने अधिकृत पत्राद्वारे वरील माहिती मंडळाचे प्रवक्ते श्री चंद्रशेखर मराठे यांना पाठविली आहे. परदेशात असुनही गेली ५० वर्षे हे मंडळ कार्यान्वित असून  उत्तर अमेरिकेतील हे पहिले मराठी मंडळ आहे. या शिवाय  मराठी शाळा गेल्या ५० वर्षापासून चालविली जाते. या संमेलनामध्ये काव्यवाचन, नाटयवाचन, कथा कथन आणि साहित्यिक विषयांवरील भाषणे असे बहुरंगी कार्यक्रम आहेत. संमेलनाचा शेवटी अध्यक्ष डॉ. संजय उपाध्ये यांच्या सोबत ‘मराठी भाषेतीची स्थिती- देशात-विदेशात’ या विषयावर साहित्यीक गप्पा आणि प्रश्नोत्तरे होणार आहेत, असे मंडळाचे अध्यक्ष श्री.ऋषिकेश रानडे आणि सचिव श्री. संग्राम पाटील यांनी कळविले आहे.


आयोजित संमेलनात डॉ. संजय उपाध्ये हे ‘जिंकलो असे म्हणा’ या विषयावर अध्यक्षीय भाषण करतील. मराठी भाषिक मंडळाचे अध्यक्ष श्री.ऋषिकेश रानडे व कार्यवाहक श्री. संग्रम पाटील यांनी सांगितले की डॉ. संजय उपाध्येंसारखे रंगभूमी वरील नाट्य लेखक, अभिनेता, गप्पाष्टककार, मन करारे प्रसन्न सारख्या लोकप्रिय एकपात्री कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतात. त्याच प्रमाणे लेखसंग्रह, संपूर्ण गीतेवर आधारित गीत भगवदगीता, वास्तव काव्यसंग्रह, इंडेमाऊची गाणी हा बालगीत संग्रह आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे चरित्र ओवीबद्ध रचणारे कवि डॉ. संजय उपाध्ये या मानद अध्यक्ष (बाह्य) पदाची गरिमा आणखी वाढवतील अशी आशी खात्री आम्हाला आहे.
डॉ. उपाध्ये यांची निवड झाल्यानंतर सर्व स्तरावरून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या जात आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »