पालिमकर सरांच्या अफाट कल्पना शक्ती, जिद्द, चिकाटी, मेहनतीला मिळालेले यश म्हणजेच व्यंगचित्र क्षेत्रातील अंतरराष्ट्रीय पुरस्कार- शिक्षणविस्तार अधिकारी जाधव
स्त्रीभ्रूणहत्या, बालकामगार, बालविवाह, वेठबिगारी यांसारख्या सामाजिक प्रश्नांवर पालिमकरांनी व्यंगचित्रातून मांडलेल्या कणखर भूमिकांचा आज सन्मान- प्रा.डाॅं.कोंका*
बीड :- बीड जिल्ह्यात आध्यात्मिक, बरोबरच कलात्मक वातावरण असून बीड जिल्ह्याचा गौरव वाढवणाऱ्या या व्यंगचित्र पुरस्कार सोहळ्यास येण्याचे भाग्य मला लाभले. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतोच असतो परंतु कार्यास शुद्धत्व असेल तर अनेक हात सहकार्याला धावून येतात. व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यातून साकार झालेले छोटे चित्र खूप काही सांगून जाते, हजारो शब्द आणि एक चित्र (फोटो) किती मोठ बोलतं. सुहास पालीमकर सरांचे एक व्यंगचित्र मतदार जनजागृतीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या ट्विटर, फेसबुकवर सरांच्या परवानगीने वापरण्यात येत असून जागतिक कीर्ती प्राप्त व्यंगचित्रकार सुहास पालीमकर हे बीड जिल्ह्याची प्रेरणा असून त्यांना मिळालेले जागतिक पुरस्कार हे बीड जिल्ह्याचा गौरव असल्याचे जिल्हा सहाय्यक माहिती अधिकारी अंजू निमसरकर(कांबळे) यांनी तर आपला बीड जिल्हा पैशाने गरीब नक्कीच असेल परंतू मनाची आणी माणुसकीची श्नीमंती सर्वत्र दिसते. जागतिक किर्तीचे व्यंगचित्रकार सुहास पालिमकर सरांच्या जागतिक व्यंगचित्र पुरस्काराने बीड जिल्ह्याचा गौरव वाढला असून पालिमकर सरांच्या अफाट कल्पना शक्ती, जिद्द, चिकाटी, मेहनतीला मिळालेले यश म्हणजेच व्यंगचित्र क्षेत्रातील अंतरराष्ट्रीय पुरस्कार असल्याचे शिक्षणविस्तार अधिकारी श्नी जाधव साहेब यांनी तसेच सुहास पालीमकर सर पहिल्या वर्ल्ड रेकॉर्डसाठी माझ्याकडे आले. सुरुवातीला सहा महिने मी त्यांची कठोर परिक्षा घेतली. त्यांच्यातील आत्मविश्वास आणी कलेचा उपासक मला दिसला. स्त्रीभ्रूणहत्या, बालकामगार, बालविवाह, वेठबिगारी यांसारख्या सामाजिक प्रश्नांवर पालिमकरांनी व्यंगचित्रातून मांडलेल्या समस्या, व्यथा , कणखर भूमिकांचा आज सन्मान होत असल्याचे प्रतिपादन वेबवल्र्ड रेकॉर्डचे मार्गदर्शक मा. प्रा.डाॅं.प्रकाशजी कोंका सर यांनी प्रतिपादन केले.
आनंदवाडी,जालना रोड भागातील पालिमकर व्यंगचित्र दालन सभागृहात शनिवारी जगातील सर्वात लहान 9mm×1.2 cm साईजचे हे व्यंगचित्र बाॅडेड लेबर या विषयावर काढण्यात आले. त्यानिमित्ताने पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी बीड जिल्हा सहाय्यक माहिती अधिकारी श्नीमती अंजू निमसरकर (कांबळे), बीड प.सचे शिक्षणविस्तार अधिकारी श्नी. जाधव साहेब, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे मार्गदर्शक प्रा. डॉ. प्रकाशजी कौंका, भास्करराव जोशी महाराज, आयुमृंगलम निवासी मुकबधीर विद्यालय बीडचे कला शिक्षक तथा जागतिक किर्तीप्राप्त व्यंगचित्रकार सुहास पालीमकर सर, सौ.पालिमकरताई, गजानन महाराज मंदिराचे ह.भ.प.श्नी.भास्कर महाराज जोशी, सामाजिक कार्यकर्ते भास्करराव पिंप्रीकर, समाजसेवक प्रविण पालिमकर, निलेशराव सर्वज्ञ आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर, परिवारातील सदस्य,स्नेहीजण, मित्र, नातेवाईक, महिला,पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पुढे बोलताना निमसरकर मॅडम म्हणाल्या की बीड सारख्या शहरातून जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड, ते पण व्यंगचित्र विषयावर आणि एक नाही तर दोन दोन जागतिक पातळीवरील रेकॉर्ड स्थापित करणे ही काही छोटी बाब नसून सुहास पालीमकर सरांच्या अफाट मेहनत जिद्द चिकाटीच्या बळावर ती त्यांना साध्य करता आली. प्रशासनस्तरावर चांगल्या कलेची दखल नक्कीच घेतली जाते. बीड जिल्हा श्री संत मन्मथस्वामी महाराज, परळीचा वैद्यनाथ ज्योतिर्लिंग, बीडचे कंकालेश्वर मंदिर, ग्रामदैवत खंडेश्वरी मातेसह विविध ऊर्जा केंद्रे असून अध्यात्मासोबतच कलेची कदर करणारा जिल्हा आहे. जिल्ह्यातील जवळपास एकविस लाख मतदारात मतदान जनजागृती याकामी पालिमकर सरांचे दररोज एक या प्रमाणे व्यंगचित्र पालिमकर सरांच्या परवानगीने शासनाच्या ट्विटर, फेसबुकवर टाकले जात असून सकारात्मक प्रतिसाद दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रास्ताविक सुहास पालीमकर सर यांनी तर भास्करराव जोशी महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात मान्यवरांनी व्यंगचित्र गॅलरीस भेट देवून शुभेच्छा व्यक्त केल्या.