हास्याची कारंजी आणि अविस्मरणीय क्षण यांनी भरलेल्या एका धमाल अनुभवासाठी सज्ज व्हा, कारण सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन लवकरच लॉन्च करत आहे एक नवीन कॉमेडी शो – ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे!’ कॉमेडीचे पारंपरिक संकेत मोडून हा शो कॉमेडीची नवी व्याख्या देण्यास सरसावला आहे. कसलेले कॉमेडीयन या शोमध्ये कॉमेडीच्या विविध शैली प्रेक्षकांपुढे सादर करतील.

संपूर्ण देशासोबत खळखळून हसणार आहे, अभिनेत्री हुमा कुरेशी! या शो मध्ये ती कॉमेडी चॅम्पियनचे पद भूषवतान दिसेल. ही मध्यवर्ती कामगिरी पार पाडताना ती विनोद, सपोर्ट आणि विविध सेगमेन्टचा आढावा यांचे मिश्रण साधेल आणि त्याला आपल्या गंमतीदार निरीक्षणाची आणि धमाल किश्श्यांची जोड देताना दिसेल. त्यामुळे यापुढे सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील वीकएंड हास्यानंद देणारा असेल आणि प्रेक्षक नक्कीच या शो ची उत्कंठेने प्रतीक्षा करतील!

या शोचा भाग बनत असल्याचा आनंद व्यक्त करताना हुमा कुरेशी म्हणते, “कॉमेडी म्हणजे ताण-तणाव पळवून लावणारा हुकमी इलाज आहे आणि आमचे लक्ष्य सधेसरळ आहे: प्रत्येक चुटक्यातून आनंद आणि हास्य पसरवणे! आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला हास्याने भरलेला विसावा मिळायला हवा, असे आम्हाला वाटते आणि ‘‘मॅडनेस मचाएंगे’ तेवढ्याच साठी घेऊन येत आहोत.”

या शोमधली आपली भूमिका सविस्तर सांगताना हुमा कुरेशी म्हणाली, “कॉमेडी चॅम्पियन म्हणून या शोमध्ये सहभागी होताना मी रोमांचित झाले आहे. मी वेगवेगळ्या सेगमेन्टमध्ये कॉमेडियन्सना वेगवेगळे टास्क देईन, जे गंमतीशीर, साधे असतील किंवा असामान्य परिस्थितीशी संबंधित असतील. यावरून त्यांचे कसब मी पारखीन. चला तर मग या धमाल सफरीवर!”

प्रोमो येथे बघा:
https://www.instagram.com/reel/C3UJ_jXqfv0/?igsh=OGtnOGdsYm42dmxh

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ लवकरच सुरू होत आहे, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »