दिग्दर्शक रोहित रावसाहेब नरसिंगे यांच्या ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

दिग्दर्शक रोहित रावसाहेब नरसिंगे यांच्या ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटात झळकणार रत्नागिरी सुपुत्र फैरोज माजगावकर

प्रेम करणाऱ्यांचा खास दिवस असलेल्या ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित आज झाला आहे.तगडी स्टार कास्ट या चित्रपटात पाहायला मिळणार असून,रहस्यमय आणि रंजक असा हा टीझर आहे.त्यामुळे चित्रपटाबद्दल कुतुहुल निर्माण झाले आहे.टीझरच्या सुरुवातीलाच आश्विनी कुलकर्णी आणि संजय खापरे हे पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहेत.
गोल्डन स्ट्राईप्स एंटरटेनमेंट एलएलपी सोबत सहयोगी अनिल एन वहाने फिल्म्स प्रोडक्शन्स आणि कियान फिल्म्स & एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेचे श्री.फैरोज अनवर माजगावकर,श्री.हुसैन निराळे,श्री.श्रीकांत सिंह आणि सह निर्मात्ये म्हणून श्री.अनिल वहाने आणि श्री.सुनील यादव ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ या चित्रपटाचे निर्मात्ये आहेत तर श्री.रोहित रावसाहेब नरसिंगे यांनी दिग्दर्शित केला आहे.चित्रपटाची कथा आणि संवाद श्री.अजित दिलीप पाटील यांनी लिहिली असून पटकथा याची देखील जबाबदारी श्री रोहित रावसाहेब नरसिंगे यांनी निभावली.अभिनेता संजय खापरे,अभिनेता सुरेश विश्वकर्मा,अभिनेता अरुण कदम,अभिनेता अभिजित चव्हाण,अभिनेता फैरोज माजगावकर,अभीनेत्री अश्विनी कुलकर्णी अशी चित्रपटाची दमदार स्टार कास्ट असून अभिनेत्री चैताली विजय चव्हाण पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसेल.साई पियुष,एलेन के पी ऊर्फ सिद्धार्थ पवार आणि निरंजन पेडगावकर हे संगीत दिग्दर्शक आहे.

टीझर मधून हा चित्रपट सीरियल किलर या विषयावर असल्याचा अंदाज येत आहे.तसंच चित्रपटात आई मुलाच प्रेम देखील दिसून येत आहे.चित्रपटाचा लुक देखील फ्रेश दिसत आहे मात्र चित्रपटाच्या कथेत काय रहस्य दडल आहे ? हे चित्रपट प्रत्यक्षात पहिल्यासच समजेल म्हणून चित्रपटाची उत्सुकता वाढत जात आहे.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »