भगवान गौतम बुध्द विश्वशांती विहार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानवता भवनाची स्थापना व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सोडला संकल्प

पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी बुधवारी भीमा-कोरेगाव येथील ऐतिहासिक शौर्य / विजयस्तंभाला पुष्पार्पण करून दर्शन घेतले व अभिवादन केले.

त्यानंतर उपस्थितांनी तथागत भगवान गौतम बुध्द विश्वशांती विहार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानवता भवन आणि गोर गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण केंद्र, वसतीगृह व ग्रंथालय/ अभ्यासिका यांचा स्थापनेचा संकल्प सोडला.


यावेळी दलित चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज डिक्की, पुणे चे संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कृत प्रा.रतनलाल सोनग्रा, ज्येष्ठ बौध्द विचारवंत भंते नागघोष, सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रशांत पगारे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण, सम्राट अशोक सेनेचे विनोद चव्हाण, भीमा कोरेगावचे सरपंच विक्रम गव्हाणे

व दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांच्या सहित अनेक नागरिक उपस्थित होते. त्यांनी विजयस्तंभाचे दर्शन घेऊन बुद्ध वंदना केली.


संपूर्ण जगामध्ये आज युध्द व ताणावाचे वातावरण आहे. अशा वेळी जगाला शांततेचा व मानवतेचा मार्ग केवळ विश्वशांतीचे महान दूत तथागत भगवान गौतम बुद्ध दाखवू शकतात. याचाच आधार घेऊन प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी मराठवाड्यातील रामेश्वर रुई येथे भव्य व सुंदर अशा तथागत भगवान गौतम बुद्ध विहार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृत भवनाची स्थापना केली.

त्याच आधारे अतिशय भव्य व देखणे असे प्रस्तावित तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वशांती भवन आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानवता भवना उभारण्याचा संकल्प डॉ. कराड यांच्या बरोबर अन्य समविचारी बुद्ध प्रेमीं यांनी व्यक्त केला.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »