
अभिनेता महेश मांजरेकर यांचे विचारः लोट्स फॅमिलितर्फे संगीत संध्याचे आयोजन
पुणे : घर हे फक्त निवास नव्हे, तर सहवास असावे. वृद्ध व्यक्ती हे प्रत्येक घराचा आधार स्तंभ असतो. अशा आधार स्तंभाला जास्तीत जास्त सुख सुविधा देणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यांची जीवनशैली सुविधायुक्त करण्याचा मानस लोट्स फॅमिलिचा आहे.” असे विचार प्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शक निर्माता महेश मांजेकर यांनी व्यक्त केले.

शहरातील प्रसिद्ध लोट्स फॅमिलीतर्फे ‘लोट्स योजनगंधा’ या नव्या प्रकल्पाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शक निर्माता महेश मांजेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर दीपक मानकर, नगरसेवक आबा शिळमकर व मराठी चित्रपट अभिनेता राहुल सोलापूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच लोट्स ग्रूपचे संस्थापक संचालक सत्या प्रभा गिरी व व्यवस्थापकीय संचालक जगदीश घोरपडे उपस्थित होते.



संगीत अशी गोष्ट आहे जी माणसाच्या भावनांशी थेट जोडली जाते. आनंदाचा प्रसंग, आल्हादायक हवामान आणि तणावपूर्ण परिस्थितीत संगीत मनाला आराम देते. हाच धागा पकडून लोट्स फॅमिलितर्फे संगीत सध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मराठी व हिंदी फिल्मी गिते, संगीत, डान्स, जोक्स, अभिनेता महेश मांजरेकर यांची मुलाकात घेऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केल्या गेले.
महेश मांजेकर म्हणाले,” घर म्हणजे केवळ चार भिंती, एक छप्पर येवढच मर्यादित नसत. त्यात आपल्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न, भावना आणि इतरही गोष्टींच वास्तुरूप प्रतिबिंब असत.”
सत्या प्रभा गिरी म्हणाले,” उत्तम सुविधांचा सहवास घेऊन शहराच्या मध्यवस्तीत १२० घरांची वास्तू निर्मिती करण्यात येत आहे. गुणवत्तापूर्ण बांधकामाबरोबरच सर्व सुविधांनी युक्त हा प्रकल्प ३६ महिन्याच्या आत मध्ये पूर्ण करण्याचा मानस आहे. शहरतील पार्कींग समस्या ओळखून येथे २०० पार्कींग सुविधा बनविण्यात येईल.”

जगदीश घोरपडे म्हणाले, “बांधकाम क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधांच्या उत्तम गोष्टी देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच येथे निसर्गाचा सहवास, उत्तम शिक्षणाचा सहवास, दळण वळणाच्या आधुनिकतेचा सहवास, आरोग्य संस्थांचा सहवासाबरोबरच सर्व अॅमेनिटीज देण्यात येणार आहे.”
यावेळी आर.जे. बंड्या यांनी अभिनेता व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलाखत घेतांना त्यांच्या येणार्या नवा चित्रपट, अभिनय क्षेत्रातील आव्हाणे, वृध्दांची समस्या सारख्या अनेक विषयांवर चर्चा केली. तसेच यावेळी रुद्र महाबळेश्वर या छोट्या मुलाने महेश मांजरेकर यांचे स्केच रेखारूट त्यांना भेट दिले.