सानवी प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत, आरती चव्हाण निर्मित आणि नितीन सिंधू विजय सुपेकर दिग्दर्शित ‘सरला एक कोटी’ या मराठी चित्रपटाने त्याचा टीझर, ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हापासूनच प्रेक्षकांची चित्रपटाप्रती उत्सुकता वाढवली होती. ईशा केसकर, ओंकार भोजने, छाया कदम, कमलाकर सातपुते, रमेश परदेशी, सुरेश विश्वकर्मा, अभिजीत चव्हाण, विजय निकम, यशपाल सरताप अशी दमदार कलाकार मंडळीच्या अप्रतिम अभिनयाने परिपूर्ण असा ‘सरला एक कोटी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने चित्रपटगृहात हजेरी लावली. मनाला भिडणा-या प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांनी तर चित्रपटाची संपूर्ण टीम भारावून गेली होती. प्रेक्षकांच्या प्रेमासह आणखी एका गोष्टीमुळे ‘सरला एक कोटी’ ला मिळाली आहे ज्यामुळे सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

‘सरला एक कोटी’ साठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट अशी की, ‘सिंधूरत्न कलावंत मंच’ आयोजित ‘कोकण चित्रपट महोत्सव २०२३’ यांच्या तर्फे ‘सरला एक कोटी’ चित्रपटाला मानाने गौरविण्यात आले आहे.

‘सरला एक कोटी’ ला ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’, ‘नितीन सिंधू विजय सुपेकर’ यांना ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’, ‘ओंकार भोजने’ याला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ आणि ‘विजय नारायण गवंडे’ यांना ‘सर्वोत्कृष्ट संगीत’ या पुरस्काराने गौरविण्यात आले असून कोकणातील मालवण येथे ‘कोकण चित्रपट महोत्सव २०२३’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी चित्रपटाची टीम येथे उपस्थित होती आणि चित्रपटाला मिळालेला हा गौरव पाहून सर्वांच्या मेहनतीचं चीझ झालं अशी भावना टीमने व्यक्त केली.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »