पिंपरी : पिंपरी येथील माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने पिंपरी करंडक ( पर्व ४ थे ) दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२३ दरम्यान नवमहाराष्ट्र विद्यालय क्रीडांगण येथे करण्यात आले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले की, सालाबादप्रमाणे याही वर्षी नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या क्रीडांगणावर भव्य फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्पर्धेसाठी कै.सुमन बाळकृष्ण वाघेरे यांच्या स्मरणार्थ प्रथम क्रमांकासाठी १ लाख ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व चषक, कै. सविता सुभाष वाघेरे यांच्या स्मरणार्थ द्वितीय क्रमांकासाठी १ लाख रुपयांचे रोख पारितोषिक व चषक, कै.दत्तोबा हरिभाऊशेठ वाघेरे यांच्या स्मरणार्थ तृतीय क्रमांकासाठी ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व चषक तसेच कै.रंगुबाई निवृत्ती कुदळे यांच्या स्मरणार्थ चतुर्थ क्रमांकासाठी २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व चषक देण्यात येणार आहे.
तसेच ४० वर्षांवरील खेळाडूंसाठी ( ४० + ) कै. योगेश पोपटराव वाघेरे यांच्या स्मरणार्थ ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व चषक, कै. संतोष नामदेव जाधव यांच्या स्मरणार्थ द्वितीय क्रमांकासाठी २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व चषक, कै. राजेश शंकर गायकवाड यांच्या स्मरणार्थ तृतीय क्रमांकासाठी १५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व चषक तसेच कै.सचिन जाधव व सोमनाथ रहाणे यांच्या स्मरणार्थ चतुर्थ क्रमांकासाठी १० हजार रुपये रोख पारितोषिक व चषक देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या क्रीडांगणावर उत्कृष्ठ खेळ होण्यासाठी अत्याधुनिक लाईट व्यवस्था करण्यात आलेले आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाच्या १२ खेळाडूना वाघेरे यांच्या वतीने टी शर्टचे वाटप केले जाणार आहे. अंतिम दिवसीय सामन्यासाठी विशेष आकर्षण डान्सिंग पंच डी..एम.रॉक यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी श्री संदीप नाणेकर ९०११०३२७७६ व श्री राजेंद्र वाघेरे ९९२२८६३८९३ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वाघेरे यांनी केले आहे.