महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधान भवन येथ Ph.D विद्यार्थ्यांच्या फेलोशिप बद्दल केलेल्या विधानाचा बालगंधर्व चौक येथे पुणे Ph.D च्या विद्यार्थ्यांच्या सोबत निषेध नोंदवला.
अजित पवार यांनी Ph.D करून काय दिवे लावणार अशा प्रकारचे वक्तव्य केले होते फेलोशीप कमी करून विद्यार्थ्याचे नुकसान करण्याचा हेतू भाजप सरकारचा आहे हे याच्यामधून स्पष्ट दिसत आहे.


गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणा पासून वंचित ठेवण्यासाठी हे सरकार काम करत आहे अशा प्रवृत्तींचा या महाराष्ट्रात ठिकठकाणी निषेध व्हायला हवा असे सरकार विध्यार्थ्यांना फेलोशिप पासून दूर करून विध्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवू शकत नाही सारथी, बारटी, महाज्योती अश्या संस्थांमधून विध्यार्थ्यांना संशोधनासाठी फेलोशिप च्या माध्यमातुन मदत करत असते परंतू सरकारच्या आर्थिक बाजूस हा खर्च देण्यास परवडत नाही ही भूमिका सरकार घेऊन काय साध्य करणार आहे इतर गोष्टींसाठी सरकार कडे पैसे उपल्ब्ध आहेत परंतु विध्यार्थ्यांना शिकण्यासाठी पैसे पुरवणे परवडत नसल्याचे यातून दिसत आहे.


यावेळी भाजप सरकरच्या विरोधात तसेच सारथी,बार्टि, महाज्योती यांच्या अधिकाऱ्यांच्या विरोध घोषणा बाजी करण्यात आली.

यावेळी पुणे शहर जिल्हा NSUI अध्यक्ष अभिजीत गोरे देशमुख उपाध्यक्ष गौरी काळे, सनी रणदिवे, जयदीप सुर्यवंशी, पुष्कर पुंडे,विद्यार्थी कृतिसमितीचे राहुल ससाणे, तुकाराम शिंदे, रविराज कांबळे व Ph.D चे विद्यार्थी उपस्थित होते

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »