
लिला पूनावाला फाउंडेशन (LPF) ने पुणे, वर्धा, अमरावती, नागपूर, हैदराबाद आणि बेंगळुरू या शैक्षणिक वर्ष 2023-2024 साठी 1,600 गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या गरजू मुलींना गुणवत्ता आणि गरज आधारित शिष्यवृत्ती दिली. यापैकी 1,300 हून अधिक मुली अभियांत्रिकी, डिप्लोमा नंतर अभियांत्रिकी, फार्मसी, नर्सिंग, विज्ञान या शाखा मध्ये पदवी आणि काही मुली पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत आणि 260 हून अधिक मुली शाळांमध्ये 7 वी इयत्तेत शिकत आहेत आणि पदवीपर्यंत त्यांचे शिक्षण सुरू ठेवतील. त्यांना एलपीएफ आर्थिक पाठिंबा देणार आहे.
वर उल्लेख केले ल्या सर्व प्रदेशांमध्ये या वर्षी दहा शिष्यवृत्ती पुरस्कार प्रदान समारंभ झाले.
एलपीएफच्या अध्यक्षा आणि संस्थापिका पद्मश्री पुरस्कार सन्मानित श्रीमती लिला पूनावाला, संस्थापक आणि विश्वस्त- श्री. फिरोज पूनावाला, एलपीएफचे विश्वस्त मंडळ- श्रीमती रोडा मेहता आणि श्रीमती विनिता देशमुख, एलपीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विश्वस्त- श्रीमती प्रिती खरे आणि एलपीएफची लीडरशिप टीम ,कॉर्पोरेट भागीदार, देणगीदार, शिष्यवृत्ती निवड समिती सदस्य, हितचिंतक यांच्या हस्ते मुलींना शिष्यवृत्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.