
६९ व्यां राष्ट्रीय पुरस्कार ची घोषणा झाली असून गोदावरी या पुरस्कार विजत्या चित्रपटासाठी साठी निखिल महाजन यांना “सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक” पुरस्कार घोषित करण्यात झाला आहे.
ज्योती देशपांडे, प्रेसिडेंट – मीडिया बिझनेस, RIL, अशा म्हणाल्या की, आजचा हा पुरस्कार म्हणजे निखील महाजन मधील प्रतिभावान शैली , समर्पण आणि कष्टाची पोचपावती म्हणण्यास हरकत नाही.
“हे यश मराठी सिनेमा आणि त्याच्या वैविध्यपूर्ण कथाकथनाच्या जोपासना करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला खोलवर प्रतिध्वनित करते. यापूर्वी ही आमच्या पहिल्या मराठी चित्रपट मी वसंतरावला ही राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता तसेच नुकतीच ब्लॉकबस्टर चा शिक्कमोर्तब झालेला आमचा बाईपण भारी देवा हा सिनेमा आजही बॉक्स ऑफिस गाजवतोय. आमचा मानस आहे की मराठीमधे असलेल्या टॅलेंटच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याचा जेणेकरून कलात्मक कथा असो किंवा व्यावसायिक, या दोन्हीचा समन्वय आम्हीं साधू शकू. आणि आज आम्हाला अभिमान आहे की मराठीतील अर्थपूर्ण कथा राष्ट्रीय स्तरावर आणण्यात आम्ही आघाडीवर आहोत.”


दिग्दर्शक निखील महाजन म्हणाले कि,”कदाचित माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ असलेल्या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला ही एक वास्तविक भावना आहे. हा पुरस्कार माझ्या आई आणि बाबांसाठी आहे ज्यांनी मला माझे स्वप्न पूर्ण करता यावे यासाठी अथक प्रयत्न केले. माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या पाठीशी उभे राहिलेले जितेंद्र जोशी यांच्यासाठी आहे, हा माझ्या संपूर्ण कलाकार आणि गोदावरीच्या क्रूसाठी आहे ज्यांनी येणाऱ्या कोणत्याही संकटांवर एखाद्या चॅम्पियन्ससारखं मात करत एकत्र येवून हा सिनेमा घडवून आणला, हा पराक्रमी गोदावरी आपल्या हृदयात धारण केलेल्या नाशिकसाठी आहे. हा माझे चित्रपट निर्माते जिओ स्टुडिओजसाठी आहे ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझा आवाज आणि दूरदृष्टी सर्वत्र पसरवली. हा पुरस्कार विक्रम गोखले यांच्यासाठी आहे ज्यांनी शूटिंगच्या पहिल्या दिवशी मी हे जिंकेन असे सांगितले होते, आणी शेवटी हा पुरस्कार ज्याच्यासाठी मी गोदावरी बनवला अशा दिग्दर्शक निशिकांत कामत साठी आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळणे म्हणजे खऱ्या अर्थाने एक वर्तुळ पूर्ण करणे होय.