उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सोबत शहराध्यक्ष दीपक मानकर आणि पदाधिकाऱ्यांनी नवीन कार्यकारणी संदर्भात सविस्तर चर्चा केली. राष्ट्रवादीची पुणे शहरात असलेली ताकद आणखी वाढवण्याच्या दृष्टीने नव्या कार्यकारिणीत सहकाऱ्यांना स्थान देण्यात येणार असून याबाबत अजित दादांशी चर्चा करुनच निर्णय घेण्यात येणार आहे. अशी माहिती पत्रकारांना शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी दिली
प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे, मंत्री मा.श्री. दिलीप वळसे-पाटील साहेब, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा मा. रुपालीताई चाकणकर यांची यावेळी उपस्थिती होती.
शिवाय माझ्यासमवेत यावेळी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, मा. सभागृह नेते श्री. सुभाष जगताप, अप्पा रेणुसे, मा. विरोधीपक्ष नेते दत्ताभाऊ सागरे, शहर कार्याध्यक्ष श्री. प्रदीप देशमुख उपस्थित होते.