पुणे : मराठी चित्रपट सृष्टीत1975 ते 1990 दरम्यान च्या काळात ते संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनले होते. हा काळ चित्रपटसृष्टीत त्यांनी गाजवला. तर त्यांना मराठी चित्रपट सृष्टीतील विनोद खन्ना देखील संबोधले जायचे. परंतु असाच हा गुणी अभिनेता फसवणुकीच्या जाळ्यात अडकल्याने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर कोसळला येथूनच त्यांच्या जीवनाची परवड सुरू झाली.
अभिनेते रवींद्र महाजन हे 77 वर्षाचे होते. ते गेल्या 8 महिन्यापासून पुण्याजवळील तळेगाव दाभाडे आंबी गावात घर भाड्याने घेऊन राहत होते. त्यांच्य घरातून दुर्गंधी येत असल्याने परिसरातील नागरिकांनी पोलिसांना कळवले . शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी बंद दरवाजा तोडून रवींद्र महाजनींचं यांचा मृतदेह घरातून बाहेर काढला शवविच्छेदनात त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल या ठिकाणी ते एकटेच राहत होते त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी यांनी दिली
घर आतून बंद होतं आणि घरातून दुर्गंधी येत होती, त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले परंतु घर आतून बंद असल्याने पोलिसांना दरवाजा तोडावा लागला. त्यावेळी रवींद्र महाजन हे पोलिसांना मृतावस्थेत आढळले. त्यांचा मुलगा व प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनी यांनी वडिलांच्या निधनाची माहिती दिली. अभिनेता रवींद्र महाजनी यांच्या पश्चात त्यांची पत्नी मुलगा आणि सून आहेत सध्या तरी त्यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. परंतु त्यांचा मृत्यू नक्कीच दोन ते तीन दिवसापूर्वी झाल्या असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. छवविच्छेदनाच्या अहवाला नंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असेही पोलिसांनी सांगितले.
रवींद्र महाजनी हे जेव्हा कर्जात बुडाले होते. तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना सांभाळले त्यावेळी खूप कमी पगाराची नोकरी करून त्यांनी त्यांचा कुटुंब सांभाळले. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीवर शोक काळा पसरली. अभिनेता रवींद्र महाजन यांचा जन्म बेळगाव येथे झाला.
त्यांचं बालपण मुंबईत गेले अतिशय गोड हँडसम चेहरा असल्याने चित्रपटसृष्टीला हा चेहरा भावला आणि दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी हा हिरा शोधून काढला.
अभिनेता रवींद्र महाजनी त्यांच्या झुंज या मराठी चित्रपटांमध्ये पहिला ब्रेक दिला या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीवर स्वतःचा धबधबा निर्माण करायला सुरुवात केला . 1975 ते 1990 दरम्यान त्यांनी एकाहून एक हीच चित्रपट मराठी सृष्टीला दिले. मुंबईचा फौजदार, देवता, लक्ष्मी, दुनिया करे सलाम, गोंधळात गोंधळ हे चित्रपट खूप गाजले. आदी चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य मिळवले. या चित्रपटातून अभिनेता रवींद्र महाजनी यांनी स्वतःची छाप सोडली. हे चित्रपट आजही कोणी विसरू शकत नाही. आजची ही पिढीत त्यांचे हे चित्रपट तेवढ्याच आवडीने बघतात