आव्हानात्मक व गुंतागुंतीच्या न्यूरोसर्जरीने असहय, सुईसाइडल वेदनांव अफ्रिकन महिलेवर पुण्यात यशस्वी उपचार
मेंदू आणि मणक्याचे प्रख्यात सर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांनी सहयाद्रि हॉस्पिटल येथे केली न्यूरोव्हॅस्क्युलर सर्जरी आणि मायक्रो व्हॅस्कुलर डीकंप्रेशन (एमव्हीडी) यांची एकत्रित शस्त्रक्रिया
पुणे : डेक्कन जिमखाना येथील सहयाद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ५४ वर्षीय पूर्व आफ्रिकन महिला रुग्णाला नुकतेच नवजीवन मिळाले. या महिला रुग्णाला एकाच वेळेला ट्रायजेमिनल आणि ग्लॉसोफॅरिंजियल न्यूराल्जियाची असह्य वेदना होती. त्याशिवाय तिच्या सेरेबेलममध्ये (लहान मेंदू) रक्तवाहिन्यांचा जटिल गुंता असलेली, मोठ्या आकाराची व उच्च दाबाचा रक्त प्रवाह असलेली गाठ (आरटेरो- व्हीनस मालफॉर्मेशन म्हणजेच ए. व्ही. एम्.) देखील होती. ही एक अत्यंत दुर्मिळ आणि गुंतागुंतीची समस्या होती आणि मेंदूसारख्या नाजूक अवयवात असल्याने आव्हानात्मक देखील होती. सहयाद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल डेक्कन जिमखाना येथे मॅदू आणि मणक्याचे प्रख्यात सर्जन डॉ. जयदेव पंचवाघ व त्यांच्या टीमने यावर यशस्वी उपचार केले. प्रथम डॉ. आनंद अलुरकर यांनी रक्तवाहिनीच्या या गुंत्यावर अँजिओग्राफी मार्फत एम्बोलायझेशन केले व नंतर डॉ. पंचवाघ यांनी आठ तासाच्या अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेने ही गाठ काढून तर टाकलीच शिवाय ट्रायजेमिनल व ग्लॉसोफॅरिंजिअल न्यूराल्जियाची शस्त्रक्रिया सुद्धा त्याच वेळेला केली. गंभीर आणि दुहेरी मज्जातंतुवेदनापासून ही महिला आता पूर्णपणे मुक्त झाली आहे आणि आफ्रिकेतील तिच्या मूळ गावी वेदनारहित जीवनाचा आनंद घेत आहे.
या केस विषयी अधिक माहिती देताना डॉ. पंचवाघ यांनी स्पष्ट केले की ट्रायजेमिनल न्यूराल्जिया (टी.एन.) म्हणजे चेहरा, हिरडी, नाकपुडी किंवा कपाळामध्ये येणारी असह्य वेदना होय. याला सुइसाइड डिसीज असेही म्हणतात “माणूस अनुभवू शकणारी सर्वात वाईट वेदना” असे भीषण वर्णन केले जाणारा हा विकार आहे. यातच भर म्हणून की काय, या महिलेला ग्लोसोफॅरिंजियल न्यूराल्जिया (घसा, जीभ, कानामधील असह्य वेदना) हा आणखी एक गंभीर विकार होता. अशा प्रकारे, दुहेरी मज्जातंतु वेदनेने ग्रस्त असलेल्या या रुग्णाची केस ही एक अत्यंत दुर्मिळ आणि असामान्य घटना आहे.
मालावीतील या रुग्णाला चार वर्षांपासून ट्रायजेमिनल आणि ग्लॉसोफॅरिंजियल न्यूराल्जिया मूळे तीव्र वेदना होत होत्या. त्यामुळे मेंदू बधिर करणारी औषधे आणि ॲटीडिप्रेसंटचा मोठा डोस या रुग्णाला सुरु होता. जोडीला, या केसमध्ये आणखी एक आव्हान होते. मेंदूच्या आत (सेरेबेलम) मध्ये आरटेरो- व्हीनस मालफॉर्मेशन चा आजार होता.
ते पुढे म्हणाले की एव्हीएम हे रक्तवाहिन्यांचे असामान्य असे क्लस्टर्स असतात जे बाधित भागात घट्ट बांधलेले असतात. या वाहिन्यांमध्ये नेहमीच्या स्नायुंचा थर आणि केशिका संरचना (कॅपीलरी) नसल्यामुळे क्तवाहिन्यांमध्ये रक्ताचा वेगवान आणि थेट प्रवाह येतो. यामुळेच AVM मधील रक्तप्रवाह सर्वसाधारण राहत नाही. बहुतेकदा मेंदूतील महत्वाच्या भागात आढळणारे AVM हे शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकणे कठीण असतेच; परंतु मेंदूचे रक्त प्रवाह नियमन अतिशय विलक्षण असल्यामुळे ते अधिक आव्हानात्मक सुद्धा असते.
ही शस्त्रक्रिया आणि उपचार सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना येथे डॉ. पंचवाघ आणि इंटरव्हेशनल न्यूरोलॉजिस्ट डॉ. आनंद अलूरकर यांच्या नियोजन व मार्गदर्शनाखाली पार पडली. वैद्यकीय तज्ज्ञांच्या टीमने कमजोर करणाऱ्या वेदना आणि बाधित नसांच्या जवळ असलेल्या अंतर्निहित सेरेबेलर एव्हीएम या दोन्हींवर उपाय करण्यासाठी एक व्यापक योजना तयार केली.
या बहुस्तरीय प्रक्रियेमध्ये, टीमने एव्हीएम अंशतः बंद करण्यासाठी प्रथम अँजिओग्राफी-मार्गदर्शित एम्बोलायझेशन केले. या तंत्रामध्ये एव्हीएमला पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये पातळ कॅथेटर घालणे, आणि त्यानंतर रक्तवाहिन्या बंद करण्यासाठी वैद्यकीय ग्ल्यू चे इंजेक्शन देणे यांचा समावेश होतो. हे एम्बोलायझेशन सुरक्षितपणे पूर्ण झाल्यानंतर, सतत रक्तस्त्राव होण्याचा धोका दूर करण्यासाठी टीमने एव्हीएम काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली.
या केस मध्ये एव्हीएमला अजूनही सेरेबेलममधील अनेक धमन्यांमधून रक्तपुरवठा होत होता. त्यामुळे, शस्त्रक्रियेदरम्यान एव्हीएम जवळून जाणाऱ्या महत्त्वाच्या ‘ट्रान्झिटिंग वेसल्स’ वेगळ्या आणि संरक्षित करण्यासाठी अत्यंत काळजी घेण्यात आली. आठ तासांच्या तीव्र आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर, सर्वात महत्त्वाची बाब राहिली – ट्रायजेमिनल आणि ग्लोसोफॅरिंजियल नसा संकुचित करणाऱ्या रक्तवाहिन्या वेगळे करणे आणि रुग्णांच्या दुहेरी मज्जातंतू वेदानांवर प्रभावीपणे उपचार करणे,
सह्याद्रि हॉस्पिटल्सचे सीओओ डॉ. सुनील राव म्हणाले, “या शस्त्रक्रिया आणि उपचारांच्या यशातून सूक्ष्म काटेकोर नियोजन, कुशल अंमलबजावणी, वैद्यकीय कौशल्यासह प्रगत न्यूरोसर्जिकल तंत्र आणि वैद्यकीय पथकाने दाखवलेली अतुलनीय बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित होते. आमच्या रुग्णांना उच्च दर्जाची सेवा पुरविणे यालाच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.’
ही जटिल, गुंतगुंतीची न्यूरोसर्जरी पुणे येथील एमव्हीडी शस्त्रक्रिया केंद्रामधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे एव्हीएम आणि मज्जातंतुवेदना यासारख्या गुंतागुंतीच्या विकारांचा सामना करणाऱ्या रुग्णांसाठी आशा निर्माण झाली आहे. गेल्या १८ वर्षा पासून डॉ. जयदेव पंचवाघ आणि त्यांची टीम पुण्यातील एमव्हीडी शस्त्रक्रिया केंद्राच्या अग्रणी आहे. २००० हून अधिक शस्त्रक्रियांचा अनुभव असलेले बहुद व एमव्हीडी शस्त्रक्रिया केंद्र आहे. भारताताल
ज्यांना एकत्रितपणे न्यूरोव्हॅस्कुलर कॉन्फ्लिक्ट सिंड्रोम म्हणून ओळखले जाते अशा ट्रायजेमि न्यूराल्जिया, हेमिफेशियल स्पॅस्म्स, ग्लोसोफॅरिंजियल न्यूराल्जिया, इंट्रॅक्टेबल टिनिटस आणि व्हर्टिगो क्षेत्रामधील उत्कृष्टता, नावीन्यपूर्णता, संशोधन आणि रुग्ण शिक्षणासाठी हे केंद्र समर्पित आहे.