
आज होळीनिमित्त पुणे शहर काँग्रेस कमिटीतर्फे माननीय अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी महागाईच्या विरोधात होलिका दहन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते संध्याकाळी सात वाजता काँग्रेस भवन च्या आवारात होलिका दहन करण्यात आले या होलिका दहन मध्ये एक प्रतिमात्मक सिलेंडरची होळी करण्यात आली.

यावेळी माननीय अध्यक्ष अरविंद शिंदे आणि त्यांच्या सौभाग्यवती कल्पना शिंदे यांनी होळीची पूजा केली, होळी ला पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवला.
त्यानंतर महागाईच्या नावाने बोंबा ठोकत होलिका दहन करण्यात आले.

यावेळी सर्वांनी महागाई विरोधात भरपूर घोषणाबाजी केली.
या कार्यक्रमासाठी अभय छाजेड, कमलताई व्यवहारे, संगीता तिवारी, अजित दरेकर, नीता रजपूत, रफिक शेख, सचिन आडेकर , द. स. पोळेकर. रणपिसे, राजा भुतडा, रवी आरडे, विशाल गुंड. भारत सुराणा, हनुमंत पवार, ज्योती परदेशी, फैयाज शेख, उपस्थित होते.

