पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे १६व्या राष्ट्रीय पातळीवरील ‘एमआयटी डब्ल्यूपीयू समिट-२०२३’ स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेला (१०४ गुण) मिळाले, तर उपविजेतेपद भारती विद्यापीठ, नवी मुंबई (४२ गुण) यांना मिळाले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संघाला करंडक व ५१ हजार रुपयांचे रोख बक्षिस देण्यात आले.


एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे दि. २० ते २४ फेब्रुवारी २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या १६ व्या राष्ट्रीय पातळीवरील ‘एमआयटी डब्ल्यूपीयू समिट-२०२३’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात संपन्न झाला.


स्पर्धेच्या समारोप व पारितोषिक वितरणप्रसंगी भारतीय लाँग टेनिस पटू व अर्जून पुरस्कार विजेत्या अंकिता रैना, कब्बडीतील अर्जून पुरस्कार विजेता शांताराम जाधव व प्रसिद्ध भारतीय लाँग टेनिस प्रशिक्षक हेमंत बेंद्रे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस होते.
याप्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्रविण पाटील, स्पर्धेचे समन्वयक प्रा.डॉ. पी. जी. धनवे , योगेश नातू, विलास कथुरे आणि महेश थोरवे उपस्थित होते. विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.


‘एमआयटी डब्ल्यूपीयू समिट-२०२३’ मध्ये देशभरातील ७४ संघांच्या माध्यमातून ३६०० विद्यार्थ्यांनी एकूण १६ क्रीडा प्रकारांत सहभाग घेतला होता. विजेत्यांना करंडक, पदके, प्रशस्तीपत्र व रोख १५ लाख रुपये रकमेची पारितोषिके देण्यात आली. क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, हॉलिबॉल, बेसबॉल, बॅडमिंटन, टेबलटेनिस, लॉन टेनिस, चेस, कॅरम, स्क्वॅश, वॉटरपोलो, स्विमिंग, रोईंग, ई स्पोर्टस व कबड्डी या १६ क्रीडा प्रकारांत या स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक क्रीडाप्रकारातील विजेत्या संघाला करंडक, सुवर्ण पदक व रुपये ३० हजार ते ८ हजार रोख. याखेरीज उपविजेत्या संघाला करंडक, रौप्य पदक व रोख रक्कम रुपये १८ हजार ते ५ हजार देण्यात आले.


शांताराम जाधव म्हणाले,“ खेळ जीवनाचा अविभाज्य अंग असून खेळामुळे आत्मविश्वास वाढतो. कोणत्याही खेळामुळे स्वतःला फिट ठेवता येते. आपल्यात धीटपणा वाढून जीवनातील प्रत्येक संकटावर मात करता येते. माझ्या जीवनाला कब्बडीमुळे कलाटणी मिळाली, त्यामुळेच सरकारी नोकरी सुध्दा मिळाली. रोज खूप प्रॅक्टिस केल्याने यश नक्कीच मिळेल. कष्टाचे फळ नेहमीच मिळते.”


हेमंत बेेंद्रे म्हणाले,“महाविद्यालयीन जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. खेळामुळे जीवनाला शिस्त लागते. तसेच शारीरिक व मानसीक आरोग्य उत्तम ठेवता येते.”
अंकिता रैना म्हणाल्या,“ कोणताही खेळ हा आपल्या जीवनाला वेगळा आकार देत असतो. त्यामुळे खेळताना खिलाडूवृत्ती असावी. रोज भरपूर प्रॅक्टिस करा. खेळासाठी १०० टक्के समर्पण भावनेने कार्य केल्यास त्या खेळात नक्कीच यश मिळविता येते. खेळाबरोबर शिक्षण ही महत्वाचे आहे.”


डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,“शिस्त आणि चरित्र्य या दोन गोष्टींना जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. त्याचा अवलंब विद्यार्थ्यांनी करावा. देशासाठी हे अत्यंत महत्वाचे असून यातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते. कौशल्य, खिलाडीवृत्ती, समर्पण या गुणांबरोबरच खेळामध्ये शिस्तही महत्वाची आहे.”
प्रविण पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले.
विद्यार्थी जान्हवी भोसले व सिध्दार्थ गाडीलकर यांनी सूत्रसंचालन केले.श्रृती देशमुख यांनी आभार मानले.
नोट- इमेलवर समिट २०२३ चे फायनल रिझल्ट पाठविले आहेत.

टेबल टेनिस (महिला)
विजेता – एमएमसीओई
उपविजेता – एमआयटी डब्ल्यूपीयू,
उत्कृष्ठ खेळाडू – अदिती सिन्हा

टेबल टेनिस (पुरुष)
विजेता – एमएमसीओई , पुणे
उपविजेता – बिट्स पिलाई गोवा,
उत्कृष्ठ खेळाडू – अर्चन आपटे

बॅडमिंटन (पुरुष)
विजेता – एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे
उपविजेता – व्हिआयटी, पुणे
उत्कृष्ठ खेळाडू – सस्मीत पाटील

बॅडमिंटन (महिला)
विजेता – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी,
उपविजेता – एमकेएसएस कमिन्स सीओई, पुणेे
उत्कृष्ठ खेळाडू – आर्या देशपांडे

व्हॉलिबॉल (पुरुष)
विजेता – बिव्हिडियू,
उपविजेता – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे
उत्कृष्ट खेळाडू – आदित्य भिलारे, एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे
उत्कृष्ट आक्रमक खेळाडू – आर्यान सिन्हा,
बेस्ट सेटर – निनाद भिलारे

व्हॉलिबॉल (महिला)
विजेता – भारतीय विद्यापीठ, पुणे
उपविजेता – सिंहगढ कॉलेज, पुणे
उत्कृष्ट खेळाडू – ऐश्वर्या जोशी,
उत्कृष्ट आक्रमक खेळाडू – श्रृती
बेस्ट सेटर – ईश्वरी शिंदे

बास्केटबॉल (पुरुष)
विजेता – एआयटी
उपविजेताः एमआयटी,
सर्वोत्कृष्ठ स्कोररः अमरिश सोलंकी
उत्कृष्ट खेळाडू – दीपक बरूणवाल

बास्केटबॉल (महिला)
विजेता – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे
उपविजेताः मणिपाल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,
उत्कृष्ट खेळाडू – सानिका शिंकर

फूटबॉल (पुरुष)
विजेता – भारतीय विद्यापीठ, पुणे
उपविजेता – एआयएसएसएमएस ,
उत्कृष्ट खेळाडू – केथॉस्तो लोहो
गोल किपर ः सिध्दांत चव्हाण

फूटबॉल (महिला)
विजेता – एमआयटी एडीटी, पुणे
उपविजेता – एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे
उत्कृष्ट खेळाडू – अर्चीशा शर्मा, एडीटी,
गोलकिपरः व्ही पुष्पांजली
गोल्डन बूट ः मैत्रेय बिरासदार, एडीटी, पुणे

क्रिकेट
विजेता ः एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे
उपविजेताः सोमया विद्याविहार युनिव्हर्सिटी,
मॅन ऑफ द मॅच ः दविड सहारे
उत्कृष्ट गोलंदाज – कन्हैया लढ्ढा
उत्कृष्ट फलंदाज ः दविड सहारे
सामनावीरः आदर्श बोथरा

बुध्दिबळ
विजेता – पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणे
उपविजेता – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे
उत्कृष्ट खेळाडू – शंकश शेकले, पीसीसीओई

कबड्डी
विजेता – वायएमसी,
उपविजेता – व्हिआयआयटी
बेस्ट रायडर – उध्दव शिंदे, व्हिआयआयटी,
टॉप डिफेन्डरः प्रथमेश कुडले, वायएमसी

स्वीमिंग ५० मीटर फ्री स्टाईल ( महिला)
विजेता – अनन्या दीप मॅनेट,
उपविजेता – मेहेक शेख एमआयटी एसबीएसआर

स्वीमिंग ५० मीटर बॅक स्ट्रोक (पुरुष)
विजेता – पार्थ गोरे, एमआयटी एडीटी,पुणे
उपविजेता – अजिंक्य गवळीे, एमएमआयटी

स्वीमिंग ५० मीटर बटर फ्लॉय स्ट्रोक (पुरुष)
विजेता – मल्हार अत्रे, एमआयटी डब्ल्यूपीयू ,पुणे
उपविजेता – अनुराग खुणे , सीओई, एडीटी

स्वीमिंग ५० मीटर बॅक स्ट्रोक (महिला)
विजेता – साईसा फुलझाले, एमआयटी एसबीएसआर , पुणे
उपविजेता – मेहक शेख, एमआयटी एसबीएसआर, पुणे

स्वीमिंग ५० मीटर बेस्ट स्ट्रोक (महिला)
विजेता – मैत्रेय मोरे, एमआयटी आयओडी
उपविजेता – खुशी लखानी, एमआयटी एसबीएसआर, पुणे

स्वीमिंग १०० मीटर बॅक स्ट्रोक (पुरुष)
विजेता – साहिल गोंगटे, डब्ल्यूपीयू, पुणे
उपविजेता – अर्जून किवनसारा, डब्ल्यूपीयू, पुणे

स्वीमिंग १०० मीटर बटर फ्लॉय स्ट्रोक (पुरुष)
विजेता -ओम दळीव, एमएमसीओई ,पुणे
उपविजेता – रोहण चौधरी, पीव्हीपीआयटी, एडीटी

५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक (पुरुष)
विजेता – सुकांत हार्डीकर, एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे
उपविजेता – पार्थ गोरे एआयटी एडीटी, पुणे

१०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक (पुरुष)
विजेता – ओम दळवी, एमएमओसीयू
उपविजेता – साहिल गंगोटे, डब्ल्यूपीयू, पुणे

५० मीटर बटर फ्लाय (पुरुष)
विजेता – पार्थ पुंडे, व्हिआयटी, पुणे
उपविजेता – सुकांत हार्डिकर, डब्ल्यूपीयू , पुणे

ई स्पोर्ट ः
विजेताः डी.वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी
उपविजेताः एआयटी डब्ल्यूपीयू, पुणे
उत्कृष्ट खेळाडूः साहिल राणे

लॉन टेनिस ः पुरूष
विजेताः पीआयसीटी
उपविजेताः एमआयटी, पुणे
उत्कृष्ट खेळाडूः स्वप्नील सिंह, एमआयटी,

लॉन टेनिस ः महिला
विजेताः एसआयसीएसआर
उपविजेताः एमआयटी डब्ल्यूपीयू पुणे
उत्कृष्ट खेळाडूः रिया वाशिमकर,

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »