१६व्या राष्ट्रीय पातळीवरील क्रीडास्पर्धेचे आयोजन
(खेळाच्या माध्यमातून राष्ट्रउभारणी आणि विश्वशांती)
पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे तर्फे एमआयटी डब्ल्यूपीयू समिट २०२३ या १६ व्या राष्ट्रीय पातळीवरील क्रीडास्पर्धेचे सोमवार, दि. २० फेब्रुवारी २०२३ ते शुक्रवार, दि.२४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत एमआयटी डब्ल्यूपीयू येथे आयोजन करण्यात आले आहे. २००४ या वर्षापासून या स्पर्धा घेण्यात येत आहेत.
या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोमवार, दि. २० फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ४.०० वाजता एमआयटी डब्ल्यूपीयू कॅम्पस, कोथरूड , पुणे येथे होणार आहे. या समारंभासाठी महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, माजी भारतीय लॉन टेनिस खेळाडू व अर्जून पुरस्कार प्राप्त गौरव नाटेकर, सुप्रिसद्ध भारतीय (ट्राय अॅथलॉन) अॅथलीट कौस्तूभ राडकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील. तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड हे उपस्थित राहतील.
या समारंभात क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल भारतीय १०० मी. स्प्रिंट लिजेंड रमेश तावडे यांना एमआयटी-डब्ल्यूपीयू क्रीडा महर्षि पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या स्पर्धेमध्य क्रिकेट, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, फुटबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस, लॉन टेनिस, कबड्डी, चेस, स्वीमिंग, ई स्पोर्टस अशा एकूण ११ क्रीडाप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.
या स्पर्धेसाठी करंडक,पदके व रोख रक्कम असे एकूण १५ लाख रुपयांची बक्षिसे व प्रशिस्तीपत्रके दिली जातील. सर्व साधारण विजेत्या संघाला करंडक व ५१ हजार रुपयांचे रोख बक्षिस दिले जाईल. प्रत्येक क्रीडाप्रकारातील विजेत्या संघाला करंडक, सुवर्ण पदक व रुपये ८ हजार ते ३० हजार रोख. याखेरीज उपविजेत्या संघाला करंडक, रौप्य पदक व रोख रक्कम रुपये ५ हजार ते १८ हजार देण्यात येणार आहे.
पारितोषिक वितरण समारंभः
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार, दि.२४ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ५.०० वा. माईर्स एमआयटी, पुणेच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात होणार आहे. या समारंभासाठी भारतीय लॉन टेनिस पट्टू व अर्जून पुरस्कार सन्मानीत अंकिता रैना व प्रसिद्ध भारतीय लॉन टेनिस प्रशिक्षक हेमंत बेंद्रे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
गेली १५ वर्षे आपण ही स्पर्धा फक्त अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी आयोजित करत आलो होतो. एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्यकारी संचालक राहूल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून या वर्षी पासून या स्पर्धेत खाजगी विद्यापीठांनाही सहभागी करून घेण्यात येत आहे.
या स्पर्धेत पुणे विभागातून ४० अभियांत्रिकी महाविद्यालये, उर्वरित महाराष्ट्रातून १०, इतर राज्यातील ३ महाविद्यालय, तसेच पुण्यातील१० खाजगी विद्यापीठे, महाराष्ट्रातून ४, बाहेरच्या राज्यातील ७ विद्यापीठे सहभागी होणार आहेत. एकूण २८ खाजगी विद्यापीठांचे व ५४ अभियांत्रिकी महाविद्यालयांचे एकूण सुमारे ४००० स्पर्धक भाग घेत आहेत. इतक्या व्यापक प्रमाणात खेळाडूंचा सहभाग असलेली देशातील ही एकमेव स्पर्धा आहे.
खेळाच्या माध्यमातून राष्ट्रउभारणी आणि विश्वशांती हा या स्पर्धा आयोजनेमागचा प्रमुख हेतू आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमाखेरीज शारीरिक क्षमतेकडेही लक्ष द्यावे, अशी संयोजकांची अपेक्षा आहे. विविध क्रीडाप्रकारांमधील निष्णात खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे व इतर विद्यार्थ्यांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी हा या स्पर्धेच्या आयोजनातील एक प्रमुख हेतू आहे.
अशी माहिती समिट राष्ट्रीय क्रीडास्पर्धेच्या आयोजन समितिचे विद्यार्थी प्रतिनिधी श्रृती देशमुख, कुशाग्र सूर्यवंशी, दिया कौल, आर्यन महाडिक आणि संवेद कुलकर्णी यांच्यासमवेत डब्ल्यूपीयूच्या सोशल इनिशिएटिव्हचे संचालक डॉ. महेश थोरवे, क्रीडा संचालक प्रा.डॉ. पी. जी. धनवे, स्पर्धेचे सल्लगार मंदार ताम्हाणे, योगेश नातू व विलास कथुरे यांनी पत्रकार परिषदेत दिल