पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी आर्ट, डिझाइन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७५व्या पुण्यतिथी निमित्ताने थोर संत, समाजसुधार व मानवतेचे महान पुजारी तत्वज्ञ राष्ट्रसंत तुकडोेजी महाराज आणि महान कर्मयोगी, क्रांतीकारी संत, समतेचे पुरस्कर्ते तत्वज्ञ संत गाडगे महाराज यांच्या भव्य पुतळ्यांची स्थापना व अनावरण करण्यात येणार आहे. हा समारंभ सोमवार, ३० जानेवारी रोजी १०.३० वा. जगातील सर्वात मोठा विश्वशांती घुमट म्हणजेच तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज व संत श्री तुकाराम महाराज प्रार्थना सभागृह, विश्वराजबाग, लोणी काळभोर, पुणे येथे संपन्न होणार आहे.


या समारंभाला राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सिक्कीमचे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील हे अध्यक्षस्थानी असतील.
त्याच प्रमाणे अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. विजय कुमार चौबे, राष्ट्रसंत तुकडोेजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष आर. चौधरी, आणि अमरावती येथील अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवामंडळ गुरूकुंज आश्रमचे सरचिटणीस जनार्दन बोथे, थोर विचारवंत प्रा. रतनलाल सोनाग्रा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारेचे अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक, ग्रामगीताचार्य, गुरूकुंज आश्रमचे अरविंद राठोड व नागपूर येथील कृषितज्ञ प्रा. डॉ. रमेश ठाकरे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.


या विश्वशांती घुमटाचे संकल्पक व रचनाकार माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असून त्यांच्या उपस्थित हा समारोह संपन्न होणार आहे. तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड व एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
अनावरण कार्यक्रमानंतर राष्ट्रसंतांच्या रचनांवर आधारित खंजिरी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम श्री गुरूदेव सेवामंडळाचे प्रा. सुरेंद्र नावडे यांच्या मार्गदर्शनात होणार आहे.


अशी माहिती नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व विश्वशांती केंद्र आळंदी चे सल्लागार डॉ. एस.एन.पठाण यांनी दिली आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »