पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केसरीवाडा येथे टिळक कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. मुख्यमंत्र्यांनी स्व. आमदार मुक्ता टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, मनपा आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, शैलेश टिळक, कुणाल टिळक, श्रुतिका टिळक, चैत्राली टिळक-भागवत, कल्पना खरे उपस्थित होते.