
पुणे : मागील पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शंभरहून अधिक मोक्याच्या कारवाया करून पुण्यातील टोळ्या संपुष्टात आणल्या अशी चर्चा सर्वत्र होती यात कोयता यांचा देखील समावेश होता अशातच काही दिवसांपूर्वी दोन तरुण हातात कोयता घेऊन आंबेगाव परिसरामध्ये दहशत माजवत होते त्यांनी दुकानाच्या काचा फोडल्या लोकांना मारले गाड्यांच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. बीट मार्शल अक्षय विठ्ठल इंगवले धनंजय ज्ञानदेव पाटील यांनी कोयत्याला सिंघम स्टाईल काठीने उत्तर देऊन त्या दोन तरुणांची पक्की जिरवली . अशा पद्धतीच्या कारवाया कोयता गॅंगवर वारंवार होत असतात ,तरी देखील मोठमोठ्या टोळ्यांमधून बाहेर पडलेले अल्पवयीन मुले भाईगिरी साठी इन्स्टा फेसबुक युट्युब तसेच साउथ चित्रपटांच्या प्रभावामुळे कोयता हातात घेऊन दहशत पसरवून कोयता टोळीच्या माध्यमातून हप्ते वसूल करण्याची पद्धत रूढ झाली

कोयता गॅंग ही एक नसून अनेक अल्पवयीन मुलं हातात कोयता घेऊन दहशत पसरवतात त्यामुळे अनेक कोयता तोळ्या पुण्यात सक्रिय दिसतात.
कोयता गॅंग चा जन्म हा मुळशी पॅटर्न मध्ये 2010 साली झाला लोकांना जमिनीसाठी हातात कोयता घेऊन धमकवणे हे या गॅंग चे उद्दिष्ट होते त्यानंतर पुण्यातील या टोळ्या संपुष्टात आल्या होत्या काही गुंडांचा खात्मा करण्यात आला तर काहीं जेलमध्ये आहेत या टोळ्यांमधील अल्पवयीन मुले आता सर्रासपणे हातात कोयता घेऊन दहशत पसरवून त्यांच्या डोळ्या चालवताना दिसतात



कारण हातात कोयता घेतल्याने हे गुंड सहज पाच ते सहा महिन्याच्या शिक्षेवर बाहेर पडतात आणि कोयता सहज बाजारात उपलब्ध असतो यामुळेच तरुण मुलांच्या टोळ्या सर्रासपणे हातात कोयता घेऊन दहशत पसरवत हप्ते वसूल करताना आढळून येतात.
हडपसर मांजरी कोंढवा मुंढवा या परिसरात कोयता टोळीने हैदोस माजवला होता 2013 साली कोयता गॅंग मे धमकवण्याच्या सीमा ओलांडून हडपसर भागामध्ये प्रकाश कोंढरे सुजित शर्मा वंशराज कांबळे यांचा यांचा खून करण्याची मजल मारली. या घटनेनंतर पोलीस खडबडून जागे झाले आणि त्यांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे या कोयत्या टोळ्यांवर लावले यात पुढाकार घेतला ते हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी.

तत्कालीन पोलीस आयुक्त डॉक्टर व्यंकटेश यांनी तर पुण्यातून कोयताच हद्दपार करण्याचे प्रयत्न केले होते. जर कुणाला कोयता हवा असेल तर त्यांनी पोलिसांचे आधी परवानगी घ्यावी परंतु याला सर्वत्र विरोध झाला कारण कोयता हा कामगार आणि शेतकऱ्यांसाठी उदरनिर्वाहाचे मुख्य साधन ठरते . तरीदेखील पोलीस आयुक्तांनी 500 कोयते ताब्यात घेतले होते या कारवाईमुळे पोलिसांना असे वाटले की पुण्यामध्ये कोयता गॅंग ही संपुष्टात आली आहे परंतु हे पोलिसांचे दिवा स्वप्न ठरले.

नुकतेच विधानसभेत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी या कोयत्यात टोळीचा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर तीन ते चार दिवसांनी पुण्यात दोन तरुण हातात कोयता घेऊन दहशत पसरवत होते याला सिंघम स्टाईलने जरी पोलिसांनी उत्तर दिले तरी मात्र पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्यापुढे परत एकदा कोयता टोळीचे आवाहन उभे आहे .
येणाऱ्या काळातच पोलीस या टोळ्यांवर कोणती कारवाई करेल किंवा त् दहशत बसवतील हे काळच सांगू शकेल द पब्लिक वाईस न्यूज पुणे