भिमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचा स्त्युत उपक्रम
पुणे : भिमा कोरेगाव विजय स्तंभ सजावटीसाठी पुण्याच्या माजी महापौर रजनीताई त्रिभुवन व महिला कार्यकर्त्यांनी फुलांच्या माळा ओवून एक आगळा वेगळा उपक्रम केला आहे .पुण्यातील सर्वपक्षीय आंबेडकरी चळवळीतील महिलांनी जात्यावरील भिमगीते गात विनल्या फुलांच्या माळा.
माजी महापौर रजनी त्रिभुवन , सुवर्णा डंबाळे , संगीता आठवले , अनिता चव्हाण , विशाखाताई गायकवाड, प्रियदर्शनी निकाळजे , आरती साठे, छाया कांबळे , अनिता धिमधीमे ,सारिका फडतरे ,मिनाज शेख , दीपिका भालेराव यांसह सर्वपक्षीय व सर्व सामाजिक संघटनांच्या महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.अशी माहिती भिमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समिती चे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी दिली.
तयारी अंतिम टप्प्यात आहे . यासाठी सर्वपक्षीय महिला ,युवक व कार्यकर्ते अतिशय उत्साहाने तयारीसाठी लागले कामाला.