चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार
कोथरुड मधील अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनवरील झाकणे खचल्याने मोठमोठे खड्डे तयार झाले होते. त्यामुळे वाहतूककोंडीच्या अनेक तक्रारी वारंवार येत होत्या. त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला असून, लोकसहभागातून ड्रेनेज लाईन्स वरील झाकणे दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले आहे.
यंदा मुसळधार पावसामुळे कोथरुडमधील रस्त्यांची दुरावस्था झाली होती. यातून मार्ग काढताना कोथरुडकरांना मोठी कसरत करावी लागत होती. अनेकदा खड्ड्यातून जाताना दुचाकी स्वारांचा तोल जाऊन पडल्याच्याही घटना घडल्या होत्या. त्यामुळे पालकमंत्री म्हणून नामदार पाटील यांनी खराब रस्ते तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश मनपा आयुक्तांना दिले होते. आयुक्तांनी तातडीने कोथरुडमधील खचलेले रस्ते दुरुस्त केले होते.
मात्र त्यानंतरही अनेक भागातील ड्रेनेज लाईनची झाकणे खचल्याने मोठमोठे खड्डे तयार झाले होते. त्यामुळे नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सदर ड्रेनेज लाईनवरील झाकणे लोकसहभागातून दुरुस्त करण्याचा निर्णय घेऊन, कार्यवाही सुरु केली.
त्यानुसार, पहिल्या टप्प्यात आशिष गार्डन परिसरातील खचलेल्या ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने इतरही भागातील खचलेल्या रस्त्यांवरील ड्रेनेज लाईन दुरुस्त करण्यात येणार आहे. दरम्यान, खचलेले रस्ते सुस्थितीत होत असल्याने, नागरिकांकडून सदर कामाप्रती समाधान व्यक्त करण्यात येत आहे.