हडपसर येथे डॉक्टर ढगे यांना पाळीव मांजराच्या पालकांनी मारले यानंतर fir ही झाली. परंतु कायद्यामध्ये कुठेही व्हेटर्नरी डॉक्टरांना सुरक्षा नसल्याचे आढळून आले यासाठीच आता पेट डॉक्टर असोसिएशन ऑफ पुणे पुढे सरसवले आहे. यानंतर आता ते माणसांच्या डॉक्टरांप्रमाणेच व्हेटर्नरी डॉक्टरांना देखील कायद्यात संरक्षण मिळावे यासाठी चळवळ उभारणार आहे महाराष्ट्रासह आता ते संपूर्ण भारतभर याचा प्रसार करून प्रयत्न करणार आहेत.

या संदर्भातील विस्तृत माहिती देणारी पत्रकार परिषद पुण्यातील हडपसर येथे डॉ. रामनाथ ढगे यांचे डॉग अँड कॅट आहे. वय वर्ष 51 असलेले डॉ. रामनाथ ढगे हे गेल्या 22 वर्षांपासून हडपसर आणि परिसरातील पाळीव प्राण्यांवर उपचार तथा शस्त्रक्रिया करत आहेत. शनिवारी दिनांक- 10/12/2022 रोजी संध्याकाळी साडेसात-आठ वाजेच्या सुमारास एक जोडपे आपले मांजर डॉ ढगे यांच्या पेट क्लिनिकमध्ये उपचारासाठी घेऊन आले. पर्शियन जातीची असलेली ती मांजर दीड वर्षाची होती व त्या जोडप्याचे ते पाळीव मांजर होते. पाळीव माजराना दर वर्षी ट्राय-कॅट आणि अँटी-रेबीज असे किमान लसीकरण करणे आवश्यक असते. दरम्यान या आजारी मांजरीचे वार्षिक लसीकरण केल्याची कुठलीही नोंद त्या जोडप्याकडे नव्हती. त्या आजारी मांजराची तपासणी करत असताना डॉ ढगे यांना काही गोष्टी लागलीच लक्षात आल्या. जसे की, मांजराच्या सोबत आलेल्या जोडप्याने सांगितल्याप्रमाणे गेल्या सात दिवसांपासून त्या मांजराचे जेवण जवळपास बंदच होते. मांजराचे शरीराचे तापमान 97.6°F एव्हढे कमी झाली होते. सर्वसाधारण पणे मांजरांचे शरीराचे तापमान 101″F ते 102.5*F या दरम्यान असते. ह्या माजराचे शरीर थंड होत चालले होते, जे अत्यंत धोकादायक स्थिती असते. त्यानंतर डॉक्टरांनी स्टेथोस्कोप द्वारे मांजराच्या हृदयाचे ठोके तपासले, त्यावरून हृदयाचे ठोक सुदधा अत्यंत कमी झाल्याचे त्यांना जाणवले. त्याचसोबत मांजराच्या छातीतून कंजेशन असल्याप्रमाणे आवाज येत होता. त्यामुळे मांजराला व्यवस्थितपणे श्वासही घेता येत नव्हता. तोंड उघडे ठेवून मांजर श्वास घेण्याचा प्रयत्न करत होते या प्रकाराला “ओपन माऊथ ब्रिथिंग” असेही म्हणतात.

सर्वसाधारण भाषेत आपण ह्याला आचके घेणे म्हणतो. एकंदरीत पेशंट अत्यंत गंभीर आहे हे डॉक्टरांनी त्या जोडप्याला सांगितले… एव्हढ्या सिरीयस असलेल्या पेशंटला प्राण्यांच्या मोठ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून लागलीच पुढच्या तपासण्या करून इलाज करणे गरजेचे होते. त्याबाबतीत डॉ ढगे यांनी मांजरीसोबत आलेल्या जोडप्याला हे समजावले की छातीचा x-ray आणि ECG करणे गरजेचे आहे. त्याचसोबल रक्ताच्या काही चाचण्या करणे आवश्यक आहे. सर्व टेस्टचे रिजल्ट मिळाल्याखेरीज रोगाचे योग्य निदान करता येणार नाही हे डॉ ढगे यांनी मांजराच्या पालकांना सांगितले. पालकांच्या सांगण्याप्रमाणे रक्तचाचणीसाठी केवळ 0.4 मिली रक्त मांजरातून घेण्यात आले. मात्र तेव्हढ्या वेळातच मांजराला प्राणांतिक झटका आला आणि ते मांजर दगावले. या स्थितीतून त्या मांजरास बाहेर काढण्यासाठी डॉ ढगे यांनी मांजराला इंजेक्शन दिले मात्र त्याचा उपयोग झाला नाही. जेव्हा मांजर मेल्याची दुःखद बातमी त्या जोडप्याला सांगितली तेव्हा त्या जोडप्यातील स्त्रीने क्लिनिकमध्ये आणि क्लिनिकच्या बाहेर ओरडा-ओरड सुरू केली


घेतले. त्या सगळ्यांनी मिळून डॉ. रामनाथ ढगे यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली तसेच दवाखान्यातील औषधे आणि साहित्याची नासधूस केली. से टोळके डॉक्टरांना मारहाण करत असताना, “आमचे माजर कसे झोपवले तसेच तुला पण झोपवता आणि तुझा दवाखाना बट करून टाकतो” अश्या धमक्या देऊन मारत होते. या दरम्यान दवाखान्यामधील सामानाची नासधूस तर झालीच मात्र डॉ ढगे याच्या उजव्या पायाच्या घोट्यालाही जबर मार बसल्यामुळे ते हाड निखळले. पाय मुडपल्यामुळे त्यांना चालणे शक्य होत नव्हते, त्यामुळे डॉक्टरांनी उजव्या पायातला शूज काढून स्वतः त्या निखळलेल्या हाडाला जोर देऊन सांधले. त्यानंतर दवाखान्यातील अटेंडन्टच्या मदतीने जवळच्या पोलीस चौकीत जाऊन तक्रार दाखल करण्यासाठी डॉ ढगे पोहोचले. तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी डॉक्टरांची परिस्थिती बघून त्यांना आधी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन इलाज सुरू करण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांनी एक महिला आणि चौघा अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे…. या घटनेत कुठेही डॉ रामनाथ ढगे यांची चूक नसताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. तसेच त्यांच्या दवाखान्यातील साहित्याची नासधूस करण्यात आली. जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी पसार झाले. मांजरांना दर वर्षी जे लसीकरण करणे गरजेचे असते ते लसीकरण केलेले नव्हते. मांजरांना वेळोवेळी जंतांसाठी डीवमिंगचे औषधे देणे गरजेचे आहे ते देण्यात आलेले नव्हते. मांजरासोबत आलेल्या जोडप्याच्या सांगण्यानुसार मांजर गेले सहा दिवस काही खात-पीत नव्हते; त्यामुळे अत्यंत डिहायड्रेट आणि अशक्त झाले होते. डॉ रामनाथ ढगे यांनी अश्या प्रसंगी मांजरासोबत आलेल्या जोडप्याचे (सदर इसम पहिल्यांदाच आपले मांजर घेऊन दवाखान्यात आले होते) नाव मोबाईल नंबर आणि इतर तपशील घेण्यात वेळ वाया न घालता तत्परतेने मांजराची तपासणी करण्यास सुरुवात केली. मांजराच्या सोबत आलेल्या जोडप्याला मांजराची परिस्थिती समजावून सांगितल्यानंतर त्यांनी रक्त तपासण्यासाठी 0.4 मिली रक्त घेतले. तेव्हढ्या वेळातच मांजर दगावले यात नेमकी चूक कुणाची ? डॉ ढगे ह्यांची की त्या मांजरीला पाळणाऱ्या त्या जोडप्याची ? डॉक्टरांना मारण्यासाठी एका फोनवर चार लोक गोळा करू शकत होते मग मांजराला योग्य वेळी उपचारास का नाही आणू शकले ? सात दिवस मांजर खात पित नाहीय म्हणून घरगुती उपचार करणे गरजेचे होते की डॉक्टरांकडे आणणे गरजेचे होते ? पाळीव मांजरीला कायद्यानुसार अँटी-रेबीज लसीकरण देणे आणि महानगरपालिकेच्या डेटाबेस मध्ये त्याची नोंद करणे आवश्यक असते. ते सदर जोडप्याने केले होते का ? केले असल्यास त्याचा पुरावा काय ? आपल्या मांजरावर असलेले प्रेम हे बेगडी आहे; हे जगास कळू द्यायचे नव्हते म्हणून डॉक्टरांवर हात उचलणे हा पर्याय असावा काय ?


मुळात आमच्या पेशट्सचे म्हणजेच मुक्या प्राण्यांचे उपचार करताना पशुवैद्यकांना त्याच्या अबोल आणि अव्यक्त भावना जाणून घ्याव्या लागतात. दवाखान्यात असलेल्या रोगनिदानाच्या संसाधनांचा आणि आमच्या पशुवैद्यकीय शिक्षणाचा उपयोग करून आम्ही प्राण्याचे रोगनिदान करत असतोच, पण त्याचसोबत आम्हाला पेशंटच्या माहितीसाठी त्याच्या पालक/मालकावर अवलंबून राहावे लागते. त्यातही बऱ्याचदा पाळीव प्राण्याच्या पालकांकडून / मालकांकडून पूर्ण माहिती दिली जात नाही, किंबहुना अनेकदा तो लपवली जाते. हयामुळे रोगनिदान आणि उपचाराचे काम अजूनच जिकिरीचे होते.

पशुवैद्यक नेहमी माणूसकी जपत अश्या आजारी मुक्या प्राण्यांवर उपचार करत असतात, मात्र अनेक वेळा काही पालकांकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे पेशंट शेवटच्या घटका मोजत असताना त्याला जवळपास असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आणण्यात येते. जेव्हा अश्या पेशंटला प्राण्यांच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची गरज असते त्यावेळी छोट्या दवाखान्यात आणून त्या डॉक्टरवर उपचारासाठी जोर जबरदस्ती करणे हे कितपत योग्य आहे ? मुळात दवाखाना आणि हॉस्पिटल हयात फरक असतो हे सुद्धा लोकांना कळू नये काय ? एखाद्या मनुष्याला हार्ट अटॅक आल्यानंतर त्याला हृदयरोगाच्या तज्ञ डॉक्टरकडे नेणे गरजेचे असते हे सगळ्यांना माहीत आहेच; मग हे सामान्य ज्ञान पशुवैद्यकीय क्षेत्राच्या बाबतीत कुठे जाते ? प्रत्येक रोगाचे किंवा प्रत्येक रुग्णाचे उपचार दवाखान्यातच करण्यात यावे यासाठी पशुवैद्यकीय डॉक्टरांवर ही जबरदस्ती का ? हॉस्पिटलमध्ये असलेल्या सुविधा छोट्या दवाखान्यात देता येणे अशक्य असते हे सुद्धा लोकांना समजत नसावे का ? अश्या एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे आज पशुवैद्यकीय डॉक्टरांना हवी आहेत. आम्हास न्याय मिळेल की नाही याची शाश्वती आम्हास नाहीय म्हणून आमचे गा-हाणे पत्रकार बंधू- भगिनींच्या समोर मांडत आहोत. लोकशाहीच्या या मोठ्‌या आधारस्तंभाकडुन आम्हास न्याय मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि पशुवैद्यक हे मुक्या प्राण्यांचे डॉक्टर असले तरी माणसेच आहेत ह्याची समाजास जाणीव होईल ही अपेक्षा आम्ही करतो. ह्या निंदनीय घटनेचा निषेध म्हणून दिनांक 14/12/2022 पासून ते 21/12/2022 पर्यत आमच्या संस्थेसोबत संलग्न असलेले समस्त खाजगी पशुवैद्यक हातावर / एप्रनवर काळ्या पट्ट्या बांधून आपला निषेध नोंदवतील. तसेच दिनांक 22/12/2022 रोजी पुणे शहरातील समस्त खाजगी पशुवैद्यकीय दवाखाने सकाळी 06.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. इमर्जन्सी रुग्णांची गैरसोय होऊ नये ह्यासाठी त्यांना सरकारी पशुवैद्यकीय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन जावे.
ही बातमी देखील बघायला विसरू नका
:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »