पुणे : जगदिशब्द फाउंडेशन व परिवर्तन सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा हा पुरस्कार स्वाभिमानी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी दिशा शेख, ॲड. विजय कुर्ले,भूमाता बिग्रेड अध्यक्ष तृप्ती देसाई, श्रीरंग गायकवाड संपादक, महादेव वाघमारे हे व्यासपीठावर होते.
गीता मोरे यांनी त्यांच्या अखंड २६ वर्षाच्या सेवेमघ्ये भोरमधील धांगवडी,हवेली तालुक्यातील शिरसवडी, भावडी व तुळापूर या ठिकाणी प्राथमिक शिक्षिका म्हणुन काम केले आहे. विद्यार्थीप्रिय शिक्षिका,उपक्रमशील शिक्षिका अशी त्यांची ओळख आहे.
या पुरस्काराबद्दल बोलताना गीता मोरे म्हणाल्या, आतापर्यंत केलेल्या प्रामाणिक सेवेचे हे फळ असून माझ्या विद्यार्थ्यांचा यात महत्त्वाचा वाटा आहे.
यावेळी तुळापुर गावचे सरपंच ॲड. गुंफाताई इंगळे, उपसरपंच राजाराम शिवले व ग्रामस्थ यांनी गीता मोरे यांचे विशेष अभिनंदन केले.