पुणे : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था( बाटीऀ ) येथील गैरकारभाराची तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याची मागणी भिमा कोरेगाव विजय रणस्तंभसेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी केली आहे . बाटीऀ ही संस्था गेली कित्येक वर्ष ज्या प्रकारे काम करीत आहे त्या प्रकारे कामकाज होत नाही .ही संस्था योग्य रित्या इ टेंडर प्रणाली नुसार कामे देत नसून नियमबाह्य पद्धतीने कामकाज चालू असल्याचा आरोप वाघमारे यांनी यावेळी केला आहे .
1 जानेवारी भिमा कोरेगाव विजय स्तंभ अभिवादन कार्यक्रम जवळ आला असून या कार्यक्रमाच्या बैठकांना स्थानिक लोक व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक टाळले जात असल्याची खंत ही वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केली .बाटीऀ च्या गैरकारभाराची तत्काळ चौकशी करून कारवाई करण्यात यावी अन्यथा अतिशय तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सर्जेराव वाघमारे यांनी दिला .
बाटीऀ या संस्थेच्या मुख्य कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले .या आंदोलनात विविध पक्ष संघटनाचे नेते व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते .या आंदोलनात पुणे शहर व जिल्हा व रणस्तंभ सेवा संघाचे शेकडो कार्यकर्ते ,महीला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .