सांगवी ; दोन ते अडीच वर्षामध्ये कोरोनाच्या हाकाराने प्रत्येकाला माणुसकी शिकवली. कोरोना आहे की नाही हे तपासण्यासाठी जशी कोरोनाची किट आवश्यक होती. तशीच प्रत्येक भाविकांसाठी देवाला पाहण्यासाठी भक्तीची किट आवश्यक असते. असा उपदेश ह. भ. प. सोपान महाराज सानप हिंगोली कर (रामायणाचार्य ) यांनी पिंपळे गुरव, कासारवाडी स्थित श्री.दत्त साई सेवा कुंज आश्रम येथे आयोजित एक ते आठ नोव्हेंबर आयोजित कीर्तन महोत्सवात केला. या कार्यक्रमाचे आयोजन आमदार लक्ष्मण जगताप त्यांचे बंधू विष्णू शेठ जगताप यांचे बंधू शंकर शेठ जगताप यांच्यावतीने करण्यात आले दिल्या गेलेले अन्नदान हे रामदास गणपतराव गायकवाड यांच्या वतीने सीताबाई गायकवाड यांच्या स्मरणार्थ देण्यात आले.


या कीर्तनाचा लाभ लाखो भाविकांनी घेतला तसेच कीर्तन संपल्यानंतर जवळपास लाखोच्या संख्येंनी महाप्रसादाचा देखील आस्वाद उपस्थित नागरिकांनी घेतला
यावेळी ह. भ. प. सोपान महाराज सानप भाविकांना उपदेश करताना म्हणाले की, महाराज किंवा कुठल्याही नेत्यांनी कायम चमचा पासन सावध राहावे. कारण चमचा जेव्हा कुठल्याही भांड्यात किंवा व्यक्तीच्या जीवनात असला तर त्या व्यक्तीचे जीवन किंवा ते भांड पूर्णतः रिकामे करतो, हे उदाहरण देताना त्यांनी भाविकांनाही सांगितले की जो तुमचे सतत कौतुक करतो मागे पुढे करतो त्यापासून सतत सावधान राहिले. पाहिजे कारण तो तुमच्या जीवनात हळूहळू विष कालवणाचे प्रयत्न करत असतो.
देवाची भक्ती करताना चित्त जवळ ठेवून भक्ती करायला हवी, जर चित्त नसेल तर ती केलेली भक्ती देवाला प्राप्त होत नाही. जर चिंता असेल तर शरीर सुद्धा कायम चितेप्रमाणे असते . चिंता देवाच्या चरणी अर्पण करून आपण हरिनामात तल्लीन होणे गरजेचे असा उपदेशही यावेळी भाविकांना देण्यात आला . प्रत्येकाला मान मिळाला पाहिजे असे वाटते आणि तो मिळतो देखील परंतु तो मान टिकवणे हे खूप कठीण असते जो हा मान टिकवतो तोच परमार्थ गाठू शकतो असेही यावेळी त्यांनी सांगितले.


भाविकांनी कायम लक्षात ठेवावे की संताच्या सानिध्यात राहायला आणि सर त्यांचे दर्शन घ्यायला भाविकांना किंवा व्यक्तीला भाग्यच असावे लागते . आपण उगाच व्यक्तीच्या मागे लागत असतो की त्याने आपल्याला जवळ केले पाहिजे परंतु तो व्यक्ती कधीही आपल्याला मनाने जवळ करत नसतो. याबाबीचे दुःख न मानता कायम देवाची भक्ती करावी की जेणेकरून देव आपल्याला जवळ करेल. आणि एकदा देवाने जवळ केले तर मग आपल्याला पुन्हा कुण्याही व्यक्तीने जवळ करण्याची आवश्यकताच भासत नाही.
कारण एखादा व्यक्ती जर देवाने जवळ केला तर त्या व्यक्तीला सर्व व्यक्ती स्वतःच्या जवळ करण्यासाठी खटाटोप करत असतात.

महाराजांनी तुकाराम महाराजांचे उदाहरण देताना सांगितले की, एक व्यक्तीने तुकाराम महाराजांना विचारले की तुम्हाला कशाची चिंता आहे, तर ते म्हणत होते मला या देहाची चिंता नाही तर हा जो देह हळूहळू समाप्ती मार्गाकडे चालला आहे. हे शरीर पूर्ण नष्ट होण्याच्या आधी तरी एकदा तरी देव भेटला पाहिजे ही चिंता सतत तुकाराम महाराजांना होती हेच त्यांनी त्या व्यक्तीला सांगितले. त् यावेळी भंडारा डोंगर येथील तुकाराम महाराजांचे मंदिर होण्यासाठी सढळ हाताने सर्वांनी मदत करावी असे देखील आवाहन केले या कीर्तन किर्तन महोत्सवातील पाचव्या परवा मध्ये दत्त मंदिरातील वातावरण मंत्रमुग्ध झाले होते प्रत्येक भाविक कीर्तनातून घरी जाताना कुठला ना कुठलातरी उपदेश स्वतः सोबत घेऊन जाण्याचा आनंद भाविकाच्या चेहऱ्यावर दिसत होता

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »