पिंपळे गुरव : पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमातून जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा पिंपळे गुरव येथील कै. काळूराम मारुती जगताप जलतरण तलाव येथे शुक्रवार (दि. २५) आयोजित करण्यात आले होते. स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी महापालिकेचे ‘ह’ क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, क्रीडा पर्यवेक्षिका जयश्री साळवे, पंच प्रमुख प्रबिर रॉय, अमोल आढाव, महेश यादव जलतरण स्पर्धा प्रमुख आत्माराम आढाव याप्रसंगी उपस्थित होते.

पिंपळे गुरव येथील कै. काळूराम मारुती जगताप जलतरण तलाव येथे १४, १७, १९ वयोगटातील मुले व मुली यांच्या जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धा भरविण्यात आले होते. स्पर्धेसाठी ऑनलाईन पद्धतीने भरून एकूण ३८० मुला मुलींनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
१४ वर्षे मुले :
वेदांत इंगळे – विजडम वर्ल्ड स्कूल (प्रथम क्रमांक), अथांग शिंदे – इंदिरा नॅशनल स्कूल (द्वितीय क्रमांक), सोहम बिरादार – युरो स्कूल (तृतीय क्रमांक)

१४ वर्षे मुली :
युक्ता लांडगे – साधू वासवाणी इंग्लिश मिडीयम स्कूल (प्रथम क्रमांक), भार्गवी काशीकर – डी.आय.सी.एस. स्टेर्लिंग स्कूल (द्वितीय क्रमांक), प्रिशा राठोड – युरो स्कूल (तृतीय क्रमांक)
१७ वर्षे मुले :
साईराज गायकवाड – राजे शिव छत्रपती शिवाजी राजे (प्रथम क्रमांक), भाटिया देवांग – युरो स्कूल (द्वितीय क्रमांक), शौर्य चौधरी – युरो स्कूल (तृतीय क्रमांक)

१७ वर्षे मुली :
काव्या शिंदे – युरो स्कूल (प्रथम क्रमांक), आहाना सरीन – इंदिरा नॅशनल स्कूल (द्वितीय क्रमांक), मिहिका पारीख – अक्षरा स्कूल (तृतीय स्कूल)
१९ वर्षे मुले –
आर्य मेढी – डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेज (प्रथम क्रमांक), अक्षत वर्मा – एस. बी. पाटील स्कूल (द्वितीय क्रमांक), विराज भोंडवे – एस. बी. पाटील स्कूल (तृतीय क्रमांक)